कोणार्क सूर्य मंदिराच्या भव्यतेने बाळासाहेब थोरात भारावले!

संगमनेर Live
0
कोणार्क सूर्य मंदिराच्या भव्यतेने बाळासाहेब थोरात भारावले!

◻️ वास्तुकला, शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा त्रिवेणी संगम - बाळासाहेब थोरात 

संगमनेर LIVE (ओडिसा) | ओडिसा राज्यातील पुरी जिल्ह्यात असलेल्या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या जगप्रसिध्द कोणार्क सूर्य मंदिराला काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी मंदिराच्या भव्यतेबद्दल आणि स्थापत्यकलेबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

कोणार्क सूर्य मंदिराच्या अद्वितीय वास्तुकलेचा आणि अप्रतिम शिल्पकलेचा अनुभव घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केल्या. ते म्हणाले, “भारतातील सर्वात प्राचीन आणि जगप्रसिध्द सूर्य मंदिरांपैकी एक असलेल्या कोणार्क सूर्य मंदिराला भेट देण्याचा आज योग आला. या मंदिराची वास्तुकला, शिल्पकला आणि ऐतिहासिक वैभव प्रथमदर्शनीच मन मोहून टाकणारे आहे.”

या भव्य मंदिराचा उल्लेख करताना थोरात यांनी सांगितले की, हे मंदिर केवळ ओडिसाचीच नव्हे, तर संपूर्ण भारताची गौरवशाली ओळख आहे. तत्कालीन स्थापत्यकौशल्याचा आणि समृध्द सांस्कृतिक परंपरेचा हा अनमोल ठेवा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा विषय आहे.

इतिहास, कला आणि संस्कृतीचा वारसा जपणारे हे पवित्र स्थळ पाहणे हा एक प्रेरणादायी आणि अविस्मरणीय अनुभव असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून नमूद केले. 

दरम्यान, या भेटीदरम्यान त्यांनी मंदिराच्या कलात्मक सौंदर्याचे मनसोक्त अवलोकन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !