मतदार यादी पुनरिक्षण मोहीमेत कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
मतदार यादी पुनरिक्षण मोहीमेत कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे - मंत्री विखे पाटील

◻️ मतदार यादीत त्रुटी आढळल्यास शासकीय यंत्रणेला कारवाईचा इशारा

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | केवळ निवडणुक म्हणून नाही तर, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मतदार याद्याची विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम महत्वाची आहे. एक जबाबदार नागरीक म्हणून यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने‌योगदान देण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
 
अहिल्यानगर शहर मतदार संघात सुरू असलेल्या मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहीमेचा आढावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाढे, उपमहापौर धनंजय जाधव, प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, काही प्रभागांमध्ये मॅपिंगचे काम चांगल्या पध्दतीने झाले आहे. परंतू  काही ठिकाणी होत असलेल्या हलगर्जीपणा पाहाता यामध्ये योग्य समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली.

एसआयआर च्या कामास मुदतवाढ मिळाल्याने उरलेल्या दिवसात अधिकचे काम करण्याची संधी आहे. बीएलओ नी खरे तर घरोघरी जाणे अपेक्षित आहे. पण ते होत नसल्याची बाब मंत्री विखे पाटील यांनी प्रातांधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. दुबार नोंदणी, मृत व्यक्तीची नावे याबाबत जागृकपणे काम होण्याच्या दृष्टीने पक्षाने नेमलेले प्रतानीधी आणी शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पश्चिम बंगालचे उदाहरण देवून मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, एक कोटी बांगलादेशी मतदार होते. एसआयआर मोहीमेमुळे या मतदारांची दहशत संपली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सतेवर आले. देशाच्या सर्वगीण विकासाचा एक रोडमॅप आणि तयार होणारे डाॅक्युमेंट महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदार मॅपिंगसह सर्व प्रक्रीया या शासकीय कार्यालयात अथवा गावातील प्रभागातील शाळांमध्ये बसून करण्याची जबाबदारी बीएलओची आहे. मात्र कुठल्या धार्मिक स्थळांतून हे काम सुरू असेल तर अतिशय गंभीर आहे. कार्यकर्त्यानी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेवून चौकशी करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी प्रातांधिकारी पाटील यांना दिले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !