व्हाईस ऑफ मीडियाच्या ‘राज्य संयोजक’ पदी पत्रकार गोरक्ष नेहे यांची निवड

संगमनेर Live
0

व्हाईस ऑफ मीडियाच्या ‘राज्य संयोजक’ पदी पत्रकार गोरक्ष नेहे यांची निवड

◻️ ​जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून केलेल्या संघटनात्मक कौशल्याची दखल

​संगमनेर LIVE | पत्रकारांचे हक्क, संरक्षण आणि सर्वांगीण सक्षमीकरणासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारणीत संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार गोरक्ष नेहे यांची ‘राज्य संयोजक' पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

​गोरक्ष नेहे हे गेल्या सुमारे २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, विकासात्मक तसेच लोकहिताच्या विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. संवेदनशील आणि प्रभावी पत्रकार म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे.

​पत्रकारितेसोबतच संघटनात्मक कार्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांनी ‘व्हाईस ऑफ मीडिया' संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. या कालावधीत त्यांनी संघटनेची ध्येय-धोरणे तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचवत संघटनात्मक बांधणीला मोठी गती दिली. राज्यस्तरीय अधिवेशने, कॅडर कॅम्प्स (अभ्यासवर्ग) आणि इतर विविध उपक्रमांमधील त्यांच्या सक्रिय आणि उल्लेखनीय सहभागाची दखल घेत केंद्रीय व राज्य नेतृत्वाने त्यांच्यावर ही नवी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

​“संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवेन. वरिष्ठ नेतृत्वाने सोपवलेली ही नवीन जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि यशस्वीपणे पार पाडून पत्रकारांच्या हितरक्षणासाठी कटिबध्द राहीन.” अशी ग्वाही गोरक्ष नेहे यांनी दिली.

दरम्यान, ​गोरक्ष नेहे यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून, तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !