पानेगांव येथे आरोग्य संपन्न गांव बैठकीत आरोग्यासह स्वच्छतेवर मंथन!

संगमनेर Live
0
पानेगांव येथे आरोग्य संपन्न गांव बैठकीत आरोग्यासह स्वच्छतेवर मंथन!

आरोग्य सेवक आठवड्यातून एकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात देणार सेवा

संगमनेर LIVE (​पानेगांव) | नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे महिलांचे आरोग्य आणि गावातील स्वच्छता यांवर भर देण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये 'माझे गांव आरोग्य संपन्न गांव' या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत डेंग्यू नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांचा विस्तार या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

​बैठकीत मार्गदर्शन करताना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा आव्हाड यांनी महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. गावामध्ये डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान राबवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.

​सध्या करजगांव अंतर्गत आरोग्य विभागाचे कामकाज सुरळीत सुरू असून, पानेगांव ग्रामपंचायतीने यासाठी कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. या कार्यालयात ग्रामस्थांच्या सोयीसाठी आठवड्यातून एकदा आरोग्य कर्मचाऱ्याने उपस्थित राहावे, अशी मागणी उपसरपंच सुरेश जंगले यांनी केली. या मागणीची दखल घेत आरोग्य समितीच्या वतीने आरोग्य सेवक आप्पासाहेब गडाख हे आठवड्यातून एक दिवस येथे उपस्थित राहतील, असे जाहीर करण्यात आले.

दरम्यान, ​या बैठकीस लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले-आंबेकर, उपसरपंच सुरेश जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, आरोग्य सेवक आप्पासाहेब गडाख, आरोग्य सेविका बळवंते, आशासेविका विमल वाघमारे, अंगणवाडी सेविका मंगल गुडधे, गोदाबाई चिंधे, सुनिल चिंधे, बाबासाहेब शेंडगे, फ्रांन्सिंस वाघमारे यांच्यासह आरोग्य समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !