कालवे काॅक्रीटीकरणाच्या अफवावर विश्‍वास ठेवू नका - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
कालवे काॅक्रीटीकरणाच्या अफवावर विश्‍वास ठेवू नका - मंत्री विखे पाटील 

◻️ आश्‍वी येथे प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरण कामांचा शुभारंभ


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | गोदावरी, जायकवाडी व भंडारदरा धरणांच्या कालव्यांची क्षमता वाढवणे, गाळ काढणे आणि अस्तरीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्याच्या नूतनीकरणावेळी कालव्याला काॅक्रीटीकरण केले जाणार असल्याच्या अफवांवर शेतकऱ्यांनी अजिबात विश्‍वास ठेवू नये. असे स्पष्ट करत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प शंभर टक्के टक्के पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

भंडारदरा प्रकल्पाच्या प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरण व सुधारणा करण्याच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ आश्‍वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे शनिवारी (दि. ८) पालकमंत्र्यांनी केला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, कैलास तांबे, शिवाजी जोंधळे, मच्छिंद्र थेटे, रोहिणी निघुते, विजय म्हसे, रतन कदम, भगवान इलग, तबाजी मुन्तोडे, अजय ब्राम्हणे, विजय डेंगळे, शिवाजी इलग, रामभाऊ भुसाळ, आशिष शेळके, सतिश जोशी, दिलिप मुन्तोडे, अशोक जऱ्हाड यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

विखे पाटील पुढे म्हणाले की, गोदावरी कालव्याची वहनक्षमता ९०० क्युसेकपर्यंत वाढवण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. राहुरी व नेवासा परिसरातील १५५ कोटी रुपयांच्या दुरुस्ती कामांमुळे वहनक्षमता १०५० क्युसेक होऊन जवळपास ७ हजार एकर जमिनीला सिंचनाचा थेट फायदा होणार आहे. कालव्याच्या शेवटच्या (टेल) शेतकऱ्यांपर्यंत पाणी सुरळीत पोहोचवण्यासाठी चाऱ्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवली जाणार असून, अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. असा इशारा देखील दिला.

​शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी धरणांतून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे, ज्यामुळे स्थानिक तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जातील. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आश्‍वी गटातील १,४९७ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ११ लाख रुपये जमा झाले असून, उर्वरित रक्कम पुढील १० ते १५ दिवसांत वर्ग केली जाईल. तसेच, पीक विम्याच्या धर्तीवर जनावरांच्या रक्षणासाठी राज्य शासन नवीन ‘पशुधन विमा योजना' सुरू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

सरकारने शेतकऱ्यांचे शेती पंपाचे ४८ हजार कोटी रूपये बील देखील माफ केले आहे. आश्‍वी येथील ऐतिहासिक इरिगेशन बंगल्याच्या नूतनीकरणासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तेथे ५०० आसनक्षमतेचे वातानुकूलित सभागृह उभारले जाणार असल्याचेही नामदार विखे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर आश्‍वी पोलीस ठाण्याच्या जागेचा प्रश्न देखील लवकर मार्गी लावण्याची ग्वाही देऊन, इरिगेशन बंगला रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी संबंधिताना दिल्या आहेत.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प शंभर टक्के होणार

पुणे-नाशिक रेल्वे मार्गात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे हा प्रकल्प शंभर टक्के पूर्ण होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !