दाढ खुर्द येथे उद्या संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा रंगणार!
◻️ धार्मिक विधी, मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आज, मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त सकाळी मूर्ती पूजन, अभिषेक आणि संत सावता महाराजांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर ह.भ.प. नामदेव महाराज घुले यांचे हरी कीर्तन पार पडेल. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
दरम्यान, या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा समिती व दाढ खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.