महिलांचे संघटन वाढवण्यासाठी शिवसेना कटिबध्द -‌ आमदार डॉ. मनीषा कायंदे

संगमनेर Live
0
महिलांचे संघटन वाढवण्यासाठी शिवसेना कटिबध्द -‌ आमदार डॉ. मनीषा कायंदे

◻️ ​संगमनेरमध्ये 'शिवदुर्गा संवाद दौरा बैठक' उत्साहात संपन्न 


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला शिवसेना आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘शिवदुर्गा संवाद दौरा’ सुरू करण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेणे तसेच पक्ष संघटनेत महिलांचा सहभाग अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केले.

​अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले तालुक्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांच्या शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल खताळ होते.

​या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांशी थेट चर्चा करत त्यांच्या संघटनात्मक आणि वैयक्तिक अडचणी समजून घेण्यात आल्या. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवणे, संघटनात्मक पातळीवर काम करताना येणारे अडथळे दूर करणे आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रात महिलांचे नेतृत्व घडवणे या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. महिलांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने योग्य तो मार्ग काढला जाईल, असा विश्‍वास आमदार डॉ. कायंदे यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी उपनेत्या सुवर्णा करंजे, सरिता माळी, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, जिल्हाप्रमुख सुनीता शेळके, सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ, महिला शहरप्रमुख दिपाली वाव्हळ, तालुकाप्रमुख संगीता बांबळे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, युवती शहरप्रमुख शिवाज्ञा आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. नीलम खताळ यांनी केले. सूत्रसंचालन पुनम दायमा यांनी तर, उपस्थितांचे आभार महिला शहरप्रमुख दिपाली वाव्हळ यांनी मानले.

​“शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात परिवर्तनाची नांदी झाली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांच्या कार्यकाळात तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच रखडलेला औद्योगिक वसाहतीचा (एमआयडीसी) प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मायबाप जनता आणि ‘लाडक्या बहिणीं'च्या आशीर्वादामुळेच मला ही सेवेची संधी मिळाली आहे. महिलांना निर्णय प्रक्रियेत व नेतृत्वात समान संधी देण्याचे काम शिवसेना करत आहे.” असे आमदार अमोल खताळ यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !