अश्‍वी इंग्लिश स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

संगमनेर Live
0
अश्‍वी इंग्लिश स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

◻️ ​वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | स्वतंत्र भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन आश्‍वी (ता. संगमनेर) येथील अश्‍वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण सुम्मतीलाल गांधी यांच्या हस्ते पार पडले.

​ध्वजारोहणानंतर एनसीसी च्या पथकाने राष्ट्रध्वजाला शिस्तबध्द मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचलन आणि संगीतमय कवायती अतिशय तालासुरात पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या या अचूक आणि देखण्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर जिल्हा परिषद शाळा आणि रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली.

​विद्यार्थ्यांच्या शुध्द पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून वर्धमान उद्योग समूहाचे स्व. सूर्यकांत देवीचंद भंडारी यांच्या स्मरणार्थ सौ. इंदुमती सूर्यकांत भंडारी यांच्यातर्फे विद्यालयाला 'आरओ वॉटर प्युरिफायर' भेट देण्यात आला तसेच त्यांच्या दुरुस्तीची कायमस्वरूपी जबाबदारी देखील घेतली. या उपकरणाचे उध्दघाटन कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

​सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सुशील भंडारी, सुम्मतीलाल गांधी, जयदीप सांगळे आणि आप्पासाहेब मुळे यांच्या वतीने आणि हस्ते गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वाटप करण्यात आले. तसेच राजेश न्यूज पेपर एजन्सीचे विलास भंडारी, सचिन उंबरकर, सुभाष गाडेकर व अन्य दानशूर व्यक्तीनी जाहीर केलेल्या बक्षिसांचे वाटपही करण्यात आले. यासोबतच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आला.

“वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना झोपण्यासाठी खाटांची आवश्यकता आहे. त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता दानशूर व्यक्ती व देणगीदारांनी सामाजिक भावनेतून पुढे येऊन सहकार्य करावे.” असे आवाहन प्र. प्राचार्य दीपक चव्हाण यांनी केले.

​याप्रसंगी ज्येष्ठ नेते विनायक बालोटे, बेबीताई विलास भंडारी, सरपंच नामदेव शिंदे, जेष्ठ पत्रकार सीताराम चांडे, योगेश रातडीया, उपसरपंच बाळासाहेब मदने, नेमीचंद भंडारी, राहुल भंडारी, रोहित भंडारी, रविंद्र भंडारी, सुभाष म्हसे, संतोष ताजने, गणेश गायकवाड, सतिष होडगर, प्र. प्राचार्य दीपक चव्हाण, पर्यवेक्षक रमेश थेटे, सेवानिवृत्त प्राचार्य राजू शहाणे, डॉ. समीर शेख, वैभव ताजणे, अनिल शेळके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ​या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुवर्णा वाकचौरे आणि अनिता गाडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षिका भारती बागुल यांनी मानले.

याप्रसंगी संस्थेचे शिक्षण हरिभाऊ कोकाटे, महारुद्र तांबे, भिमाबाई सहाणे, शिल्पा आळेकर, वैशाली आव्हाड, उषा दिघे, सखाहारी कचरे, प्रशांत वाळुंज, योगेश रुपवते, रूपाली घुले, मोहन घिगे, गोरक्षनाथ आंबेकर, राजेंद्र बर्डे, मनीषा वायाळ, मीरा जंगले, राजेंद्र केदार, पवन माळी, रूपाली गाडेकर, रवींद्र कहार, विजय सिनारे, संतोष देवरे, गोकुळ आहेर, सीमा जगदाळे, सुनंदा काळे, सोनाली वैद्य, आदित्य गोडगे यांच्यासह अविनाश जोर्वेकर, ज्योती पाटील, विजय अहिरे, तेजस गायकवाड, मंगेश शिंदे, किशोर उंबरकर आदि उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !