उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सरुनाथ उंबरकर यांच्याकडून स्वागत!

संगमनेर Live
0
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सरुनाथ उंबरकर यांच्याकडून स्वागत!

◻️ लोणी दौऱ्यादरम्यान मांची फाट्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचा जल्लोष!


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच मतदारसंघात येत असल्याने संगमनेर तालुक्यातील मांची फाटा येथे राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सरुनाथ उंबरकर यांनी परिसरातील विविध विकासकामांसाठी निधी मागणीचे एक सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिले. या निवेदनाद्वारे स्थानिक विकासाला गती देण्याची मागणी देखील करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनीही निवेदनाचा स्वीकार करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दरम्यान, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शौकत जाहगीरदार, विठ्ठल भुसाळ, भागवत खेमनर, सुरेश भुसाळ, गणेश भुसाळ, स्वप्नील उंबरकर, सचिन सारबंदे, रवींद्र भुसाळ, संकेत खेमनर, रमजान शेख, ऋतिक माळी, सुनील बर्डे, आणि हरीष उपाध्ये यांच्यासह परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी काॅग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !