मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून आश्‍वासनाची पूर्तता!

संगमनेर Live
0
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून आश्‍वासनाची पूर्तता!

◻️ हरेगाव येथील जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महायुती सरकारचा निर्णय!


संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील जमीनी मूळ मालकांना परत देण्याचा ऐतिहसिक आणि महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलना दरम्यान दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमीनी पुन्हा मिळाव्यात आशी मागणी शेतकऱ्यांची होती. यासाठी अनेक वर्ष संघर्ष झाला. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमीनी पुन्हा त्यांना मिळाव्यात म्हणून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. न्यायालयातही राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक पध्दतीने मांडण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने खंडकरी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय करून शेतकऱ्यांच्या जमीनी पुन्हा त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय केला होता.

शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या हरेगाव मळ्यातील अकारी पडीत जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात आशी मागणी घेवून शेतकरी नेते अजित काळे यांनी हरेगाव येथे असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एक महीन्यापुर्वी आंदोलन केले होते. मंत्री विखे पाटील यांनी आंदोलन स्थळी जावून शेतकऱ्यांची भेट घेवून जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर होईपर्यत कराव्या लागणाऱ्या सर्व संघर्षात मी तुमच्या बरोबर असल्याची ग्वाही दिली होती.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या  जमीनीचा निर्णय तातडीने व्हावा म्हणून या प्रश्ना संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेकवेळा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळा समवेत बैठका घेवून सर्व स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचा सकारत्मक परीणाम म्हणून राज्य मंत्रीमंडळाच्या सोमवारच्या  बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यात आला.

यापुर्वी हरेगाव येथील जमीन उद्योगांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचेही प्रयत्न झाले. पण शेतकऱ्यांचे हक्क डावलून कोणताही निर्णय होणार नसल्याची भूमिका ठामपणे विखे पाटील यांनी मांडली होती. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत जमीनी मूळ मालकांना देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत केले असून महायुती सरकारमुळे वर्षानुवर्ष कराव्या लागलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

शेती महामंडळाच्या जमीनी मूळ मालकांच्या नावावर व्हाव्यात यासाठी अनेक वर्ष काॅ. माधवराव गायकवाड आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष झाला. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या लढ्याला खरे यश शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यत कराव्या  लागेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देता आल्याचे समाधान मंत्री विखे पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या निर्णयावर व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !