​“पाणी द्यायला पायगुण चांगला लागतो; तुमचा लढा नेमक्या कोणत्या पाण्यासाठी?”

संगमनेर Live
0
​“पाणी द्यायला पायगुण चांगला लागतो; तुमचा लढा नेमक्या कोणत्या पाण्यासाठी?”

◻️ मंत्री विखे पाटलांची उपसा सिंचन योजना शुभारंभप्रसंगी थोरातावर घणाघाती टिका


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | तहानलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी महायुती सरकारमुळे मिळाले. उन्हाळ्यात सुध्दा २४७ तळे भरून दिले. पाणी द्यायला सुध्दा पायगुण चांगला लागतो.तालुक्याच्या तळ्यात पाणी जात असताना तुम्ही कोणत्या पाण्यासाठी लढाई करता असा थेट सवाल करून  सरकारला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार कणखर असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

चिंचोली गुरव (ता. संगमनेर) आणि पंचक्रोशीतील गावांसाठी सुमारे ५कोटी रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन पाईपलाईन कामाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार अमोल खताळ, भाजपाचे जेष्ठ नेते सुदामराव सानप, कपिल पवार, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, भीमराज चत्तर, आबासाहेब थोरात, श्रीकांत गोमासे, जनार्दन आहेर, शरद गोर्डे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते ग्रमास्थ उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण झाला आहे. निळवंडे धरण पूर्ण होऊनही लाभक्षेत्राला पाण्याचा लाभ मिळत नव्हता. ही खंत लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने उपसा पध्दतीनें नलिका वितरण प्रणालीच्या कामाला मान्यता देवून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. येत्या सहा महीन्यात काम पूर्ण होईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

यापुर्वी निळवंडेच्या विषयावरून केवळ विखे परिवाराला बदनाम केले गेले. जाणत्या राजाने पाच वेळा भूमीपूजनाचे कार्यक्रम केले.धरणाला ३५ वर्ष लागले. महायुती सरकराने तीन वर्षात पाणी दिले. मागील उन्हाळ्यात २२७ तळे भरून दिले. भविष्यात २३९ तळे भरून देण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन असल्याचे  स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, तालुक्यातील तळ्यामध्येच पाणी जात असताना काहीजण फक्त पाणी खाली चालल्याचे म्हणतात. तुमचा लढा नेमक्या कोणत्या पाण्यासाठी असा थेट सवाल त्यांनी नाव न घेता थोरातांना केला.

यंदा दुष्काळाचे सावट मोठे आहे. विदर्भ मराठवाड्यात परीस्थीती भीषण आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्राच्या सहकार्याने संकटावर मात करण्यासाठी सरकार सज्ज आहे. विरोधक मात्र दुष्काळाचे राजकारण करीत आहेत. फक्त द्वेषाने पछाडलेली माणस आहेत. प्रत्येक प्रश्नाचे राजकारण करण्याची सवय आहे. तुम्ही काही करू शकला नाहीत म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवले. जाणत्या राजांनी पत्र दिले. महायुती सरकारला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. संकटाला सामोरे जाण्यासाठी महायुती सरकार कणखर असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री थोरात यांचा समाचार घेताना म्हणाले “गडी पाण्यासाठी लढला म्हणूनच १३ किलोमीटर बंदिस्त योजनेच्या कामाला गती मिळाली. लोकांविषयी आस्था आणि प्रेम असल्यामुळेच अशक्य असलेली गोष्ट शक्य होत आहे. योजनेसाठी सौर उर्जा उपलब्ध करून देण्यात आली असून, भोजापूर चारीच्या दुरूस्ती काम हाती घेतल्यामुळे ७२ दिवस पाणी मिळू शकले. नदीजोड प्रकल्पात समावेश झाला. आता देवनदी प्रश्नाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वीज टंचाईवर मात करण्यासाठी मागणी प्रमाणे डिपी उपलब्ध करून दिल्या. यापुर्वी डिपीसाठी पैसे घेतले गेले. महायुती सरकारच्या काळात सौर उर्जेवर भर देण्यात आला असून, विकास कामात काहीना  अडथळे आणू नका. काहीना माझे देवदर्शन सुध्दा सहन होत नाही मात्र देव देश आणि धर्मासाठी आपले काम सुरू असून कितीही टिका करा सामान्य माणसांसाठी माझे काम सुरू असून त्यांचे पाठबळ आपल्या पाठीशी असल्याचे खताळ यांनी ठामपणे सांगितले. याप्रसंगी विठ्ठल घोरपडे आणि अभियंता प्रदीप हापसे यांची भाषण झाली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !