आश्‍वी पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता

संगमनेर Live
0
आश्‍वी पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता
◻️पोलीसांकडून एका मुलीचा शोध, तर दोघींचा तपास सुरू


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | आश्‍वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या गावांमधून तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे परिसरात पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत बेपत्तांपैकी एका मुलीचा शोध घेतला असून, उर्वरित दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमांनी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आश्‍वी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांकडून ​मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एका गावातून सायंकाळी अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली. या मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

​ही घटना ताजी असतानाच, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील आश्‍वी हद्दीतील वेगवेगळ्या गावांमधून आणखी दोन अल्पवयीन मुली आपापल्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली. एकाच दिवशी दोन मुली गायब झाल्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. यातील एका बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, दुसऱ्या मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचे समोर आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ​अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या वाढत्या घटनांची पोलिसांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आश्‍वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके उर्वरित मुलींचा व संशयित आरोपींचा कसून शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !