‘विरासत आणि विकास’च्या समन्वयातून विकसित भारताचा नवा अध्याय!

संगमनेर Live
0
‘विरासत आणि विकास’च्या समन्वयातून विकसित भारताचा नवा अध्याय!
◻️ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २५ वर्षांच्या कार्याचे मंत्री विखे पाटलांकडून कौतुक


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचवीस वर्षाची कारकीर्द सकंल्प, संघर्ष आणि राष्ट्र सेवेसाठी समर्पित झालेली आहे. विश्‍वमान्य नेतृत्व म्हणून जगात त्यांचा गौरव होत आहे. विकसित भारताची वाटचाल साध्य करताना विरासत आणि विकास यांचा योग्य समन्वय त्यांनी साधला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांंनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील वाटचालीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभेचे’ आयोजन करण्यात आले होते. सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्याचे प्रभारी लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अक्षय कर्डीले, आमदार विवेक कोल्हे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अध्यक्ष अनिल मोहीते यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते. सभेनंतर शहरातून सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून महाविशाल गणपती मंदीरात प्रधानमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी महाआरती करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीस पंचवीस वर्ष पूर्ण होत झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, २५ वर्षाचा हा प्रवास एका व्यक्तिच्या राजकीय कारकीर्दीचा नाही तर, हा संकल्प, संघर्ष, संघटन विकास आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचा आहे.

संघाच्या स्वयंसेवकापासून सुरू झालेला प्रवास देशाच्या पंतप्रधान पदाच्या सर्वोच्च स्थानापर्यत पोहचला त्याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येक पदाच्या जबाबदारीत पंतप्रधान मोदी यांनी प्रशासन विकास आणि जनसहभाग केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा आदर्श निर्माण केला.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली अनेक अर्थांनी बदलत्या भारताचा प्रवास आपण पाहात आहोत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास आणि सबका प्रयास हा मंत्र देशाच्या केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली गरीब शेतकरी महीला, युवक मध्यमवर्ग, उद्योजक आणि समाजातील वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी काम प्रत्येक निर्णयातून झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

जनधन योजनेपासून ते डिजिटल व्यवहारांपर्यत आणि घरकुल योजनेपासून ते आयुष्यमान भारत योजनेचा लाभ समाजातील छोट्या घटकांना देवून अंत्योदयाचा मंत्र  प्रत्यक्षपणे कृतीत उतरवला गेल्यामुळे सामान्य माणूस देशाच्या विकास प्रक्रीयेशी जोडला गेला आहे.

पंचवीस वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीत झालेले परिवर्तन म्हणजे भारताची डिजीटल वाटचाल,मोबाईल बॅकींग डिजीटल पेमेंट, सरकारी सेवा आणि व्यवहार सामान्य माणसाच्या हातात आले आहेत. युपीआय ही भारताच्या डिजीटल क्षमतेची जगभरात चचिर्ली जाणारी ओळख बनली असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडीया या माध्यमातून भारत उत्पादन तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न मोदीच्या नेतृत्वात झाल्यामुळेच स्टार्टअप्स संस्कृती संरक्षण उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स सेमीकंडक्टर नवीकरणीय उर्जा आणि पायाभूत सुविधा यामध्ये भारताची स्वतंत्र ओळख जगामध्ये निर्माण झाल्याचा अभिमान मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांमधून नव्या संधी उपलब्ध होत आहेत. युवकांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी स्कील इंडीया, नारीशक्ती ही केवळ घोषणा न राहाता विकासाची शक्ती बनली पाहीजे हा विचार पंतप्रधानाच्या दूरदृष्टीने अधिक ठळक झाला असून बदलता भारत आणि भारताची जगातील बदलती प्रतिमा मोदींच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी झाल्याचा अभिमान प्रत्येक देशावासीयांच्या मनामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

स्टॅच्यु ऑफ युनिटी पासून आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची केलेली उभारणी, तीन तलाखाच्या कायद्यातून  मुस्लीम महीलांची सुटका किंवा ज्यासाठी शामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान झाले ते ३७० कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय हा विकसित भारताचा एक नवा अध्याय या वाटचालीतून  निर्माण झाला आहे. त्यांच्या  नेतृत्वाखाली विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटीबध्द होण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. 
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !