शहागडाचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
शहागडाचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणार - आमदार अमोल खताळ

◻️​ ऐतिहासिक महोत्सवासाठी शासनाकडून ५० लाखांचा निधी मंजूर; दीड कोटींसाठी पाठपुरावा सुरू




​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक शहागडाचा गौरवशाली इतिहास केवळ तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता तो महाराष्ट्र तसेच देश-विदेशात पोहोचवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शहागडावर आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य ऐतिहासिक महोत्सवासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मिळवण्याचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​पेमगिरी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास आमदार खताळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री पेमादेवीची महाआरती करून भाविकांशी संवाद साधला.

​उपस्थितांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “या भूमीच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याचा माझा प्रामाणिक संकल्प आहे. आमदार झाल्यानंतर शहागडाच्या संवर्धन आणि विकासाचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात सातत्याने मांडला. ऋषिपंचमीच्या दिवशी शहागडावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर शासन दरबारी केलेल्या प्रभावी सादरीकरणामुळेच पर्यटन विभागाने ५० लाखांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे.”

​शहागडाचे ऐतिहासिक महत्त्व सर्वदूर पोहोचवण्यासाठी येथे तीन ते चार दिवसांचा भव्य ऐतिहासिक महोत्सव आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या महोत्सवाच्या उध्दघाटन अथवा मुख्य कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शहागडावर निमंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

​पेमगिरी परिसरातील पाणीटंचाईवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त करताना आमदार खताळ म्हणाले की, मोरदरा पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या भागातील जलसाठा वाढवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले असून, पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा मार्गी लावला जाईल.

दरम्यान, शहागडावर पथदिवे सुरू करण्याचे दिलेले आश्‍वासन आमदार खताळ यांनी पूर्ण केल्याबद्दल स्थानिक गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शहागडाच्या सर्वांगीण विकासातून पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आगामी मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री पदांची संधी मिळावी. अशी अपेक्षा ग्रामस्थांच्या वतीने दिलीप कोल्हे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !