इंदुरीकर महाराजांच्या हस्ते ‘वर्धमान इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स’चा शुभारंभ!

संगमनेर Live
0
इंदुरीकर महाराजांच्या हस्ते ‘वर्धमान इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स’चा शुभारंभ!

◻️नूतन दालनात दसरा-दिवाळीनिमित्त ग्राहकांना १० ते ५० टक्क्यांपर्यंत भरघोस सूट


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ग्राहकांचा अतूट विश्‍वास आणि गुणवत्तेची अखंड परंपरा जपणारे आश्‍वी बुद्रुक मुख्य बाजारपेठेतील ‘वर्धमान इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ या अत्याधुनिक व भव्य दालनाचा शुभारंभ समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या शुभहस्ते नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या नूतन दालनामुळे परिसरातील नागरिकांना आता घरगुती व व्यावसायिक उपकरणांच्या खरेदीसाठी संगमनेर, लोणी किंवा कोल्हारसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही.

​उध्दघाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले, “ग्रामीण भागात व्यवसाय करताना केवळ नफा न पाहता ग्राहकांचे समाधान, पारदर्शक व्यवहार आणि विश्‍वास जपणे हीच दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली असते. वर्धमान इलेक्ट्रिकलने नेहमीच दर्जेदार वस्तू, ग्राहकाभिमुख सेवा आणि प्रामाणिक व्यवहारातून लोकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. आजचे हे आधुनिक व सुसज्ज दालन म्हणजे ग्राहकांच्या याच विश्‍वासाची पोचपावती आहे. सणासुदीच्या काळात स्थानिक पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भंडारी परिवाराचे कौतुक वाटते.” असे गौरवोद्गार महाराजांनी काढले.

​ग्रामीण भागातील ग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीचा विचार करून या भव्य शोरूममध्ये इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल जगतातील नामवंत कंपन्यांची उत्पादने अधिकृतपणे थेट होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, आयएफबी, वर्लपूल, गोदरेज, फिलिप्स, बजाज यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही, आधुनिक रेफ्रिजरेटर, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, गॅस शेगडी, पंखे तसेच शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी दर्जेदार वॉटर प्युरिफायर आणि फिल्टर्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. 

याशिवाय पॉलीकॅब, आरआर केबल, अँकर, गोल्ड मेडल अशा अव्वल कंपन्यांचे हाऊस वायरिंग साहित्य, दीर्घकाळ टिकणारे एलईडी दिवे आणि घराच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे अशा सर्व वस्तू वाजवी दरात एकाच छताखाली मिळणार असल्याने नागरिकांना खरेदीचा समृध्द अनुभव मिळणार आहे.

​दसरा आणि दिवाळी सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दालनातर्फे खरेदीवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत थेट भरघोस डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबतच प्रत्येक प्रमुख खरेदीवर हमखास व आकर्षक मोफत भेटवस्तू देऊन ग्राहकांचा आनंद वाढवला जाणार आहे. विशेष म्हणजे पैशांची कोणतीही अडचण सणासुदीच्या खरेदीत अडथळा ठरू नये, यासाठी बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट आणि पाईनलॅब या नामांकित वित्तीय संस्थांच्या माध्यमातून माफक कागदपत्रांवर झिरो डाऊनपेमेंट आणि विनाव्याज सुलभ हप्त्यांची (ईएमआय) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे शोरुमचे सर्वेसर्वा रोहित भंडारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

​या मंगलमय उध्दघाटन सोहळ्याप्रसंगी ॲड. शाळीग्राम होडगर, भगवानराव इलग, अशोकलाल भळगट, फुलचंद भळगट, भरत भळगट, संतोष भळगट, विनीत गांधी, संतोष गांधी, सतिश गांधी, योगेश गांधी, जितेंद्र मेहेर, शितल लुणीया, संजय गांधी, सुमतीलाल गांधी, सुशील भंडारी, नेमीचंद भंडारी, सरपंच नामदेव शिंदे, डॉ. अनिल बालोटे, विजय हिंगे, सोमनाथ जोंधळे, संतोष रासने, योगेश सांगळे, मकरंद गुणे, अशोक म्हसे, योगेश कुलथे यांच्यासह नवकार ग्रुप, आश्‍वी व्यापारी असोसिएशन, कट्टा ग्रुप, हनुमान चालीसा ग्रुपचे सर्व सदस्य आणि पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत रोहित भंडारी, राहुल भंडारी व रवींद्र भंडारी यांनी केले, तर, संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्चना खिवंसरा यांनी केले. परिसरातील सर्व ग्राहकांनी या दालनास अवश्य भेट देऊन मनसोक्त खरेदी करावी, असे आवाहन भंडारी परिवार आणि व्यापारी वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे. 

दरम्यान, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष वाघेश्‍वरी, नसीर पठाण, दत्तात्रय भुसारी, युनूस पठाण, गणेश गोसावी यांनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !