​प्रवरेचे सैनिक स्कूल ग्रामीण विद्यार्थ्याना देशसेवेची प्रेरणा देणारे केंद्र - डॉ. महेश खर्डे

संगमनेर Live
0
​प्रवरेचे सैनिक स्कूल ग्रामीण विद्यार्थ्याना देशसेवेची प्रेरणा देणारे केंद्र - डॉ. महेश खर्डे

◻️​पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूलचा २९ वा वर्धापन दिन साजरा

◻️गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


संगमनेर LIVE (अनिल शेळके ) | पारंपरिक शिक्षणासोबतच सैनिकी शिक्षणाच्या माध्यमातून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे आणि अग्रगण्य स्थान निर्माण केले आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले हे सैनिक स्कूल आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरले आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संचालक डॉ. महेश खर्डे यांनी केले.

​लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल’च्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कर्नल सुभाष घोडगिरे, प्राचार्य राजेश माघाडे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. खर्डे म्हणाले की, संस्थेचे मार्गदर्शक व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संस्थेचे उपक्रम नेहमीच विद्यार्थी-केंद्रित राहिले आहेत. या शैक्षणिक गुणवत्तेमुळेच प्रवरेचे नाव आज जागतिक स्तरावर पोहोचले आहे.

​शिस्त, क्रीडा कौशल्य आणि नेतृत्वगुणांची जडणघडण
या सैनिक स्कूलने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता विविध क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळवण्याची, अंगभूत कलागुणांना वाव देण्याची आणि शिस्त, आत्मविश्‍वास व नेतृत्वगुण विकसित करण्याची भक्कम संधी उपलब्ध करून दिली आहे. आज या विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी प्रत्यक्ष देशसेवेत विविध पदांवर कार्यरत असून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून वर्षभरात विविध स्पर्धा, उपक्रम आणि कलाप्रकारांत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दरम्यान, या ​कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक केतन तेलोरे यांनी केले, तर सहशिक्षक ज्ञानेश्‍वर पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !