शेतकरी व कष्टकऱ्यांच्या जीवनात समृध्दी नांदो; दुष्काळाचे सावट दूर होवो!

संगमनेर Live
0
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या जीवनात समृध्दी नांदो; दुष्काळाचे सावट दूर होवो!

◻️ ​शनिशिंगणापूर येथे आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठल लंघे यांच्या हस्ते महाआरती


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील अडचणी दूर होऊन सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृध्दी आणि उत्तम आरोग्य नांदावे, तसेच राज्यावरील दुष्काळाचे सावट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी शनिदेवाच्या चरणी केली.

​शनि अमावस्येच्या पवित्र पर्वावर शनिशिंगणापूर (ता. राहुरी) येथे आमदार अमोल खताळ आणि नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिदेवाची विधिवत महापूजा व महाआरती भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधींनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेऊन राज्यातील बळीराजाच्या आणि जनतेच्या कल्याणासाठी साकडे घातले.

​महापूजेनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “आज शेतकरी आणि कष्टकरी वर्ग अनेक नैसर्गिक व आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. शेती क्षेत्रावर येणारी संकटे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळावा, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव व कष्टाचे चीज व्हावे, हीच आमची प्रामाणिक भावना आहे.”

​पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे, प्रत्येकाला उत्तम आरोग्याचा लाभ व्हावा आणि महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी आम्ही आज शनिदेवाच्या चरणी नतमस्तक झालो आहोत.

दरम्यान, ​या धार्मिक सोहळ्यादरम्यान मंदिर परिसरातील भाविक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनि अमावस्येनिमित्त भाविकांनी केलेल्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !