संघभावना, संयम आणि परिश्रमातून यश निश्चित - भीमराज दराडे

संगमनेर Live
0
संघभावना, संयम आणि परिश्रमातून यश निश्चित - भीमराज दराडे

◻️ ​प्रवरा अभिमत विद्यापीठात राष्ट्रीय वैद्यकीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ


संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | “जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मनातील ऊर्जा सकारात्मक मार्गाने व्यक्त होते. भावी डॉक्टरांनी स्वतःचे आरोग्य उत्तम राखले, तरच ते समाजातील रुग्णांची अधिक प्रभावीपणे सेवा करू शकतील. यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळ, संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण परिश्रमाची कास धरावी," असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी केले.

लोणी ​येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (प्रवरा अभिमत विद्यापीठ) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील आंतर-वैद्यकीय महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या उध्दघाटनप्रसंगी ते बोलत होते.

​याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे विश्‍वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे, क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार आणि क्रीडा शिक्षक नितीन गोर्डे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

​आपल्या भाषणात पुढे बोलताना भीमराज दराडे म्हणाले, “प्रवरा परिसराला सहकाराचा एक समृध्द आणि आदर्श वारसा लाभला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून या ग्रामीण भागाचा सर्वांगीण कायापालट झाला. शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्रात प्रवरेचे योगदान अतुलनीय आहे. आज कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही अत्याधुनिक आरोग्यसेवा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी संजीवनी ठरत आहे.”

​उध्दघाटनाच्या औपचारिक घोषणेनंतर प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे ३५ संघ दाखल झाले असून, तब्बल ४०० हून अधिक भावी डॉक्टर-खेळाडू विविध खेळांमध्ये आपले कौशल्य पणाला लावत आहेत. या स्पर्धेमुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात क्रीडोत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपेश खाबिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन रीया छल्लानी यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !