पुणे-नाशिक थेट रेल्वेसाठी संगमनेरात ‘जागरण-गोंधळ’

संगमनेर Live
0
पुणे-नाशिक थेट रेल्वेसाठी संगमनेरात ‘जागरण-गोंधळ’

◻️​रेल्वे कृती समितीचे संगमनेर बसस्थानकासमोर अनोखे आंदोलन


​संगमनेर LIVE | पुणे-नाशिक थेट रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी आणि शासनस्तरावरील दिरंगाई दूर व्हावी, या मागणीसाठी संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समिती'च्या वतीने अनोखे ‘जागरण-गोंधळ’ आंदोलन करण्यात आले. डॉ. अनिल काकोडकर समितीला अभ्यासासाठी दिलेली ६० दिवसांची मुदत पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर, सरकारला व समितीला त्यांच्या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

​महाराष्ट्राच्या समृध्द लोकपरंपरेचे प्रतीक असलेल्या जागरण-गोंधळाच्या माध्यमातून आंदोलकांनी कुलदैवत खंडोबा, काळभैरवनाथ आणि आई अंबाबाईच्या चरणी साकडे घातले. “पुणे-नाशिक रेल्वे हा केवळ दळणवळणाचा मार्ग नसून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय हेतूशिवाय केवळ लोकहितासाठी हा प्रकल्प तत्काळ मार्गी लागावा,” अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

​या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मूळ प्रस्तावित मार्गाचा ठामपणे पुनरुच्चार केला. नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-जुन्नर-नारायणगाव-मंचर-चाकण-पुणे या सर्वसमावेशक मार्गावरूनच ही थेट रेल्वे धावली पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. काकोडकर समितीने आपला सकारात्मक अहवाल देऊन शासनाने यावर तातडीने पुढील ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

​आंदोलनानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार माळवे यांची भेट घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाने या लोकभावनेची त्वरित दखल न घेतल्यास भविष्यात जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, ​या आंदोलनात देवगाव ग्रामस्थ, रेल्वे समर्थक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व व सहभाग मधुसूदन शिंदे, रवींद्र लामखडे, कोमल म्हस्के, शंकर पावसे, शिबा गायकवाड, दत्ता ढगे, सागर कोल्हाळ, संजय देशमुख, संतोष शिंदे, मुकुंद शिंदे, तुषार पानसरे, किरण देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, विनय सावंत, राजाभाऊ अवसक, इंजिनिअर संतोष फापाळे, गणपत लामखडे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी नोंदवला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !