श्री साईबाबा संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांचे योगदान!

संगमनेर Live
0
श्री साईबाबा संस्थांनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांचे योगदान!

◻️ दुष्काळ निवारणासाठी पालकमंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याकडे धनादेश सुपुर्द


संगमनेर LIVE (​शिर्डी) | महाराष्ट्रातील दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी आणि दुष्काळ निवारण उपाययोजनांना बळ देण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी हा मदतीचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

​या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा मंत्रीगिरीश महाजन उपस्थित होते.

श्री साईबाबा संस्थान केवळ देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना सेवा-सुविधा पुरवण्यापुरते मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संकटाच्या काळात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. राज्यातील बळीराजा आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने प्रशासकीय पातळीवर राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी हे ५ कोटींचे योगदान देण्यात आले आहे. संकटकाळात राज्याला दिलेली ही मदत संस्थानच्या सेवाभावी कार्यपरंपरेला साजेसा असा मोठा दिलासा ठरली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !