संगमनेर ( प्रतिनिधी ) कोरोना महामारीमुळे शाळा व कॉलेजसहित सर्वच जग थांबले आहे. असे असतानाही शिक्षण प्रक्रियेमध्ये खंड न पडता मार्च महिन्यापासून शैक्षणिक शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. अमृतवाहिनीतील सर्वच शिक्षक विद्यार्थांना ऑनलाईन यंत्रणेद्वारे मायक्रोसोफ्ट टीम्स वर नियमित व्याख्यान आणि प्रात्यक्षिकामुळे ऑनलाईन व प्रायव्हेट क्लाऊडद्वारे प्रभावी शिक्षण होत असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण प्रणाली चर्चा सत्रच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे , प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, प्रा. डॉ. एस. के. सोनकर,उपप्राचार्य अशोक मिश्रा,डॉ.मधुकर वाकचोरे, डॉ.रेखा आसने,प्रा.रविंद्र ताजने,प्रा.विजय वाघे आदी उपस्तीथ होते.
लॉकडाऊन काळात अमृतवाहिनी मध्ये इन्स्टिट्यूटेशनल रिपोझीटरीत प्रत्येक विद्यार्थ्याला लॉगीन देण्यात आले आहे. विद्यार्थी आपल्या मोबाईल व कॉम्प्यूटर द्वारे हस्तलिखित नोटस, व्हीडीओ लेक्चर, प्रात्यक्षिके, गृहपाठ डाऊन लोड करू शकतात. प्रायव्हेट क्लाउड तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य घरबसल्या उपलब्ध होत आहे. तसेच शैक्षणिक वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे व्याख्यान, प्रश्नोत्तरे, शंकानिरसन आणि उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जाते. क्लाऊड कॉम्प्युटिंग या विषयामध्ये पीएचडी. पूर्ण केलेल्या डॉ. सोनकर यांनी संशोधनाचा उपयोग करून त्यांनी हि महाविद्यालयासाठी प्रायव्हेट क्लाउड तयार करून त्यावर इन्स्टिट्यूटेशनल रिपोझटरी डीप्लोय केली आहे. संशोधन करून त्या संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयातील शिक्षक करत आहे.
कोव्हीड १९ च्या टाळेबंदीच्या काळात महाविद्यालयातील विविध विभागांनी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, परिसंवांद, मार्गदर्शन शिबिरे ऑनलाईन पद्धतीने राबवली. अमृतवाहिनीच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर पालकवर्गही कुतूहलीत व आनंदी आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट क्लाऊड चा वापर नेटवर्क उपलब्धतेनुसार करता येत आहे त्यामुळे त्यांचे शैक्षणिक शिक्षण चालू आहे. ह्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर ३५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि शैक्षणिक वर्ष सुरळीत चालू आहे.
अमृतवाहिनीच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीवरील कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात , विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे , प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश आणि सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.