अहमदनगर : कोरोनाचं अपयश झाकण्याकरिता राज्य सरकार हे कंगना राणावत चा आधार घेत आहे अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
कंगना रणावत हिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कंगनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड सुरू झाली आहे. शिवसेने देखील कंगनावर आरोप केले तर कॉंग्रेसने थेट भाजपाच्या जे पोटात आहे ते कंगनाच्या मुखातून बाहेर येत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान कंगनाची चर्चा करण्यापेक्षा कोरोनावर लक्ष देण्याची आज जास्त गरज आहे. कंगना रणावत हिने जे भाष्य केले आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही. मात्र अस्मितेचे प्रश्न तयार करायचे आणि कोरोना हाताळण्यामध्ये सरकारच जे अपयश आहे ते अपयश झाकण्याकरिता खरं तर राज्य सरकार कंगनाचा आधार घेत आहे.
भारतीय जनता पक्षावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप करण्यापेक्षा आज कोरोना हाताळण्यामध्ये ज्यांच्यावर कोरोना सांभाळण्याची जी मूळ जबाबदारी होती ते घरात बसलेले आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नसल्याने आज महाराष्ट्रच चित्र कोरोनामुळे भयानक झाला आहे. त्यामुळे अपयश झाकण्यासाठी कंगनाचा आधार सरकारला घ्यावा लागतो यापेक्षा दुर्दैव काय असू शकतो अशी टीका नावं न घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी टीका केली आहे.