अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही.
बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगणा राणावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान आहे. गेल्या काही दिवसांपासून जे भाजपच्या पोटात आहे ते कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही असे वक्तव्य महाविकास आघाडीतील मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.