◻ पती, सासु व साऱ्याविरूध्द गुन्हा दाखल.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल २७ वर्षीय विवाहित महिलेने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून महिलेच्या भावाने आश्वी पोलीस ठाण्यात पती, सासु व साऱ्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर शुक्रवारी रात्री उशीरा शोकाकूल वातावरणात या मयत विवाहितेवर अत्यंसंस्कार करण्यात आले.
याबाबत महिलेचा भाऊ रवींद्र मंडलिक याने आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, माझी बहीण जया उर्फ चित्रा राहुल ताजणे (वय - २७) हिचा विवाह १८/८/२०११ रोजी आश्वी बुद्रुक येथिल राहुल ताजणे याच्याबरोबर विधिवतपणे झाला होता. लग्नाच्या दोन महिन्यानतंर सासरी किरकोळ कारणावरुन तिला त्रास देणे व मारहाण करणे सुरु झाले. त्यामुळे बहिण माहेरी येत होती. यावेळी आम्ही वारंवार तिची समजूत काढून नादंण्यासाठी तिला सासरी पाठवत होतो. बहिणीला एक मुलगा व एक मुलगी होऊनही तिच्या सासरी वागणूकीत कोणताही बदल झाला नाही. त्याच्याकडून वारंवार बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ सुरु होता.
वडिलाचे पित्र असल्याने ८/९/२०२० रोजी बहिनीला आणण्यासाठी तिच्या घरी गेलो असता तिला ७/९/२०२० रोजी मारहाण व शिवीगाळ झाल्यामुळे तिचा नवरा तिच्याशी बोलत नसल्याचे कळाले. यावेळी पित्राच्या कार्यक्रमासाठी तिला घेऊन आलो असता सासरच्या त्रासाला कटांळल्यामुळे जीव नकोसा झाल्याचे ती म्हणाली होती. यावेळी आम्ही तिची समजूत काढून तिला पित्राचा कार्यक्रम झाल्यानतंर दुसऱ्या दिवशी सासरी पाठवले होते.
शुक्रवार दि. १८/९/२०२० रोजी दुपारी ४ वाजता लोणी येथिल प्रवरा हॉस्पिटलमधून बहिण सिरीयस असल्याचा फोन आला. यानतंर याची माहिती मी भाऊ व दाजीना देऊन लोणीला जाण्यासाठी निघालो व दाजी राहुल ताजणे यांना फोन केला असता फोन दुसऱ्याने उचलत तुम्ही लवकर या तुमच्या बहिनीला पी. एम. ला चालवल्याचे सांगुण फोन कट केला. त्यामुळे आम्ही घाबरलो व लोणी येथे पोहचलो असता तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. त्यामुळे वारंवार होणाऱ्या मानसिक त्रास व मारहाणीमुळे तिने आत्महत्या केल्यामुळे नवरा राहुल ताजणे, सासरा नामदेव ताजणे व सासु सुमन ताजणे यांच्या विरुद्ध आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा रंजिस्टर नबंर ३६६/२०२० प्रमाणे भादंवी कलम ३०६, ४९८ (अ) ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधाकर मांडवकर हे करत असून पोलीसानी पती व सासूला ताब्यात घेतले आहे.