संगमनेर Live | कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन दिले.
शिक्षक अशोक गिते यांनी टिपले छायाचित्र..
तालुक्यातील चंदनापुरी घाट येथे तामकड्या धबधब्याचे पिप्रीं-लौक आजमपुर येथिल शिक्षक अशोक गिते यानी प्रवासादरम्यान टिपलेले धबधब्याचे विहंगम दृष्य.
दाढ खुर्द येथे नागाचे पिल्लु आढळले..
संर्पमित्र शिवा पवार यानी आज दाढ खुर्द येथिल शिक्षक रावसाहेब जोशी यांच्या घरात दीड फूट लांबीचे नागाचे पिल्लु धरले व या कुटुंबाची दहशतीतून मुक्तता केली. या नागाने सहा उंदीर फस्त केले होते.
पानोडी येथिल हौसाबाई तळेकर यांचे निधन.
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कै. ग. भा. हौसाबाई देवराम तळेकर (वय - ८५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात, चार मुले, सुना, मुली, जावई, पुतने व नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रवरा शिक्षक पतसंस्था लोणीचे उपाध्यक्ष व आश्वी खुर्द महाविदयालयात कार्यरत असलेले शिक्षक नानासाहेब तळेकर, प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब तळेकर, बाबासाहेब तळेकर व संपत तळेकर याच्यां त्या मातोश्री होत.