◻ पंचनामे करुन लिबुं बागासाठी एकरी ५० हजार तर इतर पिकाना २५ हजार रुपये भरपाई द्या ; शेतकऱ्याची मागणी.
संगमनेर Live | देशात व राज्यात ८ महिन्यापासून कोरोनाचे संकट, मागील ३ वर्षे दुष्काळ व जुनपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी आजमपूर येथील शेतकऱ्याची बाजरी, मका, तुर, कपाशी, सोयाबिन आदि पिकासह जनावराचा चारा पिके व लिंबु बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे येथिल शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने तात्काळ या ठिकाणच्या शेतीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लिबुं बागासाठी एकरी ५० हजार व इतर पिकासाठी एकरी २५ हजार नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी भारत गिते यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यानी केली आहे.
राज्यात मार्चपासुन कोरोना या जीवघेण्या आजारान थैमान घातले आहे. शेतकऱ्याना दुध धंद्यामधुन प्रपंच चालवण्यासाठी २ पैसै मिळत होते. परंतू लॉकडाऊन व शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुध धंदा ही मोडकळीस आला आहे. कर्ज काढुन घेतलेल्या गायी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना विकाव्या लागत असून पिकवलेला भाजीपाला कवडीमोल भावाने व्यापाऱ्याना द्यावा लागत असल्याने आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी आलेला दिवस पुढे ढकलत आहे.
परंतू यांच जगाच्या पोशीद्या शेतकऱ्यांच्या मुळावरचं निसर्गाची अवकृपा मागील जुनपासुन सततच्या पावसाच्या माध्यमातून सुरु आहे. कर्जाचा डोगंर काढुन उभी केलेली पिके अक्षरशा डोळ्यासमोर पाण्यात भुईसपाट झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. एकीकडे दुधाला भाव नाही, जनावरांना चारा नाही, बाजरी मका, कपाशी ही पिके सडून गेली आहेत. आता जगायचे कसे व घेतलेले कर्ज फेडायचे कसे या दुहेरी विवचंनेत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे आभाळच फाटल तर थिगळ लावयच कुठं हा प्रश्न आ वासून शेतकऱ्यांनपुढे उभा ठाकला आहे.
पिप्री - लौकी परिसरातील शेतकऱ्यांनी मागील ३ वर्षे महाभयंकर दुष्काळात टॅकरने पाणी घालुन आपल्या लिंबाच्या बागा जगवल्या पण, त्या बागा आता अतिवृष्टीन डोळ्या देखत उध्वस्त होताना पाहव्या लागत असल्यामुळे येथिल शेतकरी पुर्णपणे हताश झाला आहे. जनावराचा चारा असलेली घास, मका हि पिके सडून गेलीत. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था ‘ आई भिक मागु देईना, व बाप पोट भरु देईना ’ अशी झाली आहे.
ऐवढे होऊनही शासन व प्रशासन मात्र मुग गिळून गप्प आहे. शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मोठेपणा अधिकाऱ्याकडून दाखला जात नसल्याने शेतकऱ्यानमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने एकरी २५ हजाराची मदत तर लिंबाच्या बागांना एकरी ५० हजार भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत असून सरकार जर ऐकनार नसेल तर शेतकरी रस्त्यावर येतील असा इशारा लिंबु बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लावरे, भाऊसाहेब मुंढे, रमेश कदम, सिताराम गिते, रमेश गिते, भिमराज गिते, अशोक रमेश गिते, अशोक दराडी, रामदास दातीर, सिताराम दातीर, राजेंद्र गिते, सुनिल गिते, शरद दराडी, मज्जु पिंजारी, तुळशिराम भुसारी, संजय मुंढे, दादाहारी गिते, भागवत नाना दातीर, अहिलाजी लावरे, शिवाजी दातीर, बाबासाहेब दातीर, गोकुळ गिते, महादेव गिते, रावसाहेब लावरे, योसेफ कदम, अनिल गिते, रामदास गिते आदिसह शेतकऱ्यांनी दिला आहे
दरम्यान याबाबत लवकरचं शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटुन निवेदन देणार असल्याची माहिती मिळाली आहे.