◻संगमनेर तालुक्याच्या शिरपेचात रोवला मानचा तुरा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथिल रहिवासी व सध्या मुबंई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या मुरलीधर अनाजी आंधळे यांची कन्या धनश्री मुरलीधर आंधळे हिने भारत सरकारच्या अण्विक परमाणू विभागाने घेतलेल्या परिक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत संगमनेर तालुक्याला मोठा बहुमान प्राप्त करुन दिला आहे.
धनश्री आंधळे चे १ ली ते १० वी पर्यतचे शिक्षण विस इग्लिशं स्कूल ठाणे येथे झाले असून तिने नवी मुबंई येथिल वीर जिजामाता टेक्नीकल इस्युंटूयुट नेरुळ येथून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे. तसेच तिने बँचलर डिग्री रामराव आदिक टेक्नीकल इस्युंटूयुट नेरुळ येथून तर मास्टर डिग्री डि. वाय. पाटील इंजिनियरीग महाविद्यालय नेरुळ येथून चागल्या गुणानी संपादित केली आहे. याआधी गुणवतेच्या बळावर तिची एल. आय. सी. च्या डिव्हिजनल आँफिसर या पदासाठी निवड झाली होती.
दरम्यान भारत सरकारच्या अण्विक परमाणू विभागाने घेतलेल्या परिक्षेत धनश्री आंधळे ही दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे मुबंई येथिल भाभा अणुसंशोधन केद्रांत उच्च पदावर तिची नियुक्ती झाली आहे. धनश्री चे वडील मुरलीधर आंधळे हे मुबंई येथे अग्निशमन दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असून आई सौ. लक्ष्मी आंधळे या गृहणी आहेत. तर भाऊ आशुतोष आंधळे हा सिव्हिल इंजिनियर व एमबीए झालेला आहे. मुलीच्या या यशाबद्दल धनश्री सह तिच्या कुटुंबाचे माजी मंत्री व भाजपचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, शिवनेरी उद्योग समुहाचे प्रमुख भगवानराव इलग आदिसह पंचक्रोशीतील ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.