संगमनेर Live | सोमवार (२१ सप्टेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात ४७ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली असून आज बरे झालेल्या ८२ रुग्णाना घरी सोडण्यात आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील संगमनेर शहरात ५, झोळे येथे ६, सायंखिडी येथे ४, वडगांव लांडगा येथे २, चिचंपूर येथे ८, तळेगाव येथे १, देवकौठे येथे १, पेमरेवाडी येथे १, बोटा येथे ९, रायतेवाडी येथे २, निमगावपागा येथे २, पिपंळे येथे १, गुंजाळवाडी येथे ३, घुलेवाडी येथे १ व संगमनेर खुर्द येथे १ असे एकून ४७ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील कोरोना बांधीत रुग्णाचे बरे होण्याचे प्रमाण ८९.७८ टक्के असून २४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान आतापर्यत एकून ३४ कोरोना बांधीताचा मृत्यू झाला आहे.
टिप :- कोरोना रुग्णाबाबत उशीरा नव्याने आलेली माहिती अपडेट करण्यात येईल.