◻ थोरात कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न.
संगमनेर Live | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शतत्वावर कारखान्याची वाटचाल सुरु आहे. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारासह तालुक्यात सातत्यपूर्ण विकासाची वाटचाल सुरु आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून ऊस हे शास्वत पिक असल्याने शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखान्याचा सन २०२० - २१ या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी बोलत ते होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर बाजीराव खेनमर, इंद्रजित थोरात, शिवाजीराव थोरात, व्हा. चेअरमन संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, जि. प. सभापती सौ. मिराताई शेटे, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, विशेष लेखा परीक्षक राजेंद्र देशमुख, सुरेश थोरात, सौ. शांताबाई खैरे, तहसीलदार अमोल निकम, पो. नि. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता काळे, शेखर वाघ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंदा वाघ, दादासाहेब कुटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनाली कुटे, विनोद हासे व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली हासे, डॉ. तुषार दिघे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुरेखा दिघे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न झाला.
याप्रसंगी बाबा ओहोळ म्हणाले कि, कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत असून ही विकासाची संस्कृती आहे. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. कोरोना संकटात तालुक्यातील नागरिकांना कारखान्याने भरीव मदत केली. अद्यावत कोविड सेंटर सुरु केले. शेतकर्यांसाठी अनुदानाच्या अनेक योजना राबविल्या. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी. इंद्रजित थोरात यांनी वाडी वस्तीवर जाऊन विकासाच्या योजनांचा पुरवठा केला. देवकौठे पर्यंत पाणी पोचविण्याचे काम केले. पावसाचे पाणी आवश्यक भागात नेण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून काम केले. यापुढे ही विकासाची वाटचाल चालू राहिल असे ही ते यावेळी म्हणाले.
अॅड. माधवराव कानवडे म्हणाले कि, आपला कारखाना नवीन आहे. कार्यक्षेत्रात ऊसाची जास्तीत जास्त लागवड झाली तर लवकरच कारखाना कर्जमुक्त होवून शेतकर्यांना अधिक भाव मिळेल. तिर्थरुप दादांचे नाव असलेल्या हा कारखाना महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात कायम लौकिकास्पद राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले कि, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस आहे. मात्र ऊसावर तांबेरा सारखा रोग आला यावर वेळीच कारखान्यामार्फत फवारणी करण्यात आली. डिस्टलरी व गव्हाणीचे आधुनिकीकरण झाले असून येत्या गाळप हंगामासाठी कारखाना सज असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, इंद्रजित खेमनर, अभिजीत ढोले, भाऊसाहेब शिंदे, माणिक यादव, सौ. मंदा वाघ, आर. बी. रहाणे, सुरेश झावरे, शिवाजी जगताप, गौरव डोंगरे, किशोर टोकसे, तात्या कुटे, नानासाहेब दिघे, नानसाहेब शिंदे, रामनाथ शिंदे, हभंप नवनाथ आंधळे, राजेंद्र कडलग, किशोर टोकसे, शांताराम कढणे, सुभाष आहेर, साहेबराव कवडे, सचिन खेमनर, किरण कानवडे, नवनाथ गडाख,केशव दिघे,राजेंद्र कढणे, शंकर ढमक, भास्कर पानसरे आदि उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.