◻ नव्या इमारतीत लवकरच सुरू होणार न्यायालयीन कामकाज - ना. बाळासाहेब थोरात.
संगमनेर Live | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाचे कामकाज एकत्रित व सोयीस्कर रित्या व्हावे यासाठी घुलेवाडी फाटा येथे उभ्या राहिलेल्या अद्यावत व वैभवशाली अशा प्रशस्त नव्या न्यायालय इमारतीची पाहणी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना. थोरात यांनी केली असून या इमारतीत लवकरच कामकाज सुरु होईल असे ते म्हणाले.
घुलेवाडी फाटा येथे अद्यावत वैभवशाली न्यायालयाची इमारत उभारण्यात आली असून यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुहास आहेर, जि. प. सदस्य अजय फटांगरे, के. के. थोरात, उपाध्यक्ष अॅड. त्र्यंबक गडाख, अॅड. अशोकराव हजारे, अॅड. नानासाहेब शिंदे, बार असोसिएशनचे अॅड. सुनील गाठे, अॅड. अमित सोनवणे, अॅड. मधुकर गुंजाळ, अॅड. प्रकाश राहाणे, अॅड. सचिन डुबे, अमोल घुले, कैलास सरोदे, राजेश खरे, अॅड. प्रकाश गुंजाळ, अॅड. अमित सोनवणे, सिताराम राऊत, घुलेवाडीचे सरपंच सोपान राऊत, सौ. वंदनाताई गुंजाळ, अॅड. प्रशांत गुंजाळ, सुरेश थोरात, कैलासराव पानसरे, सुभाष सांगळे यांसह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संगमनेर मध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व प्रशासकीय इमारती ह्या नव्याने दिमाखदार व वैभवशाली उभ्या केल्या आहेत. पंचायत समिती, नगरपालिका, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, भव्य क्रीडा संकुल , कवी अनंतफंदी खुले नाट्यगृह, शासकीय विश्रामगृह, प्रवरा नदीवरील विविध पूल, संगमनेर बायपास, पोलीस कर्मचारी वसाहत यासह संगमनेर मध्ये उभे राहिलेले सर्वात मोठे हायटेक बस स्थानक हे शहराच्या वैभवात भर घालणारे आहे.
संगमनेरात न्यायालयीन कामकाज मोठे असून तीन जिल्हा न्यायाधीश, एक दिवानी न्यायाधीश, पाच वरिष्ठ स्तर न्यायाधीश, पाच दिवाणी व प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश असे न्यायालय कार्यरत आहेत. सध्याच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असून ती दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात संघ व तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्यामुळे येथे औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालय होण्याची शक्यता असल्याने ही सर्व न्यायालय एकाच ठिकाणी होण्यासाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या महसूल मंत्री पदाच्या काळात राज्य सरकारकडून ३३ कोटींचा निधी घेऊन ही भव्य व अद्ययावत इमारत उभी केली होती. तसेच वकील असोसिएशनच्या मागणीनुसार महसूल विभागाची काही जागा वकील संघासाठीही उपलब्ध करून दिली आहे.
तसेच सरकारकडून नवीन निधीची मंजूरी घेवून इमारतीत मुख्य अंतर्गत जोड रस्ते, डांबरीकरण व मजबुतीकरण, संरक्षक लोखंडी गेट, जमीन सपाटीकरण दोन चाकी वाहने, न्यायाधीशांसाठी स्वतंत्र वाहन तळ व इमारत व परिसरात विद्युत जनरेटर करणं न्यायालयाचे सुशोभीकरण वकील पक्षाच्या अंतर्गत फर्निचर या बाबींसाठी निधी मंजूर करून घेतला होता. ही इमारत तालुकास्तरावरील अद्यावत वैभवशाली अशी महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील एकमेव इमारत ठरणार असून या इमारतीची पाहणी आज नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून या अद्ययावत इमारत ती लवकरच न्यायालयाचे कामकाज सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळूरे, तहसिलदार अमोल निकम, पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडीत, सुनिल पाटील, अभय परमार आदि मान्यवर उपस्थित होते. या इमारतींमुळे घुलेवाडी परिसराची वैभव वाढले असून लवकरच कामकाज सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे.