◻ आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये आढळले पुन्हा बांधीत रुग्ण.
संगमनेर Live | गुरुवारी (१ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ४६ कोरोना बांधीत रुग्णाची भर पडली आहे. तर आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक व शिबलापूर येथे पुन्हा बांधीत रुग्ण आढळून आले आहेत.
गुरुवारी सापडलेल्या कोरोना बांधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे १३, आश्वी बुद्रुक येथे १, शिबलापूर येथे १, केळेवाडी येथे १, डोळासणे येथे १, जवळे बाळेश्वर येथे ३, चिकणी येथे १, सायंखिडी येथे २, धांदरफळ बुद्रुक येथे १, धांदरफळ खुर्द येथे १, जवळे कडलग येथे १, मंगळापूर येथे १, शेडेवाडी येथे १, वडगावपान येथे २, गुंजाळवाडी येथे ५, मालदाड येथे २, रायते येथे ३, मांडवे बुद्रुक येथे १, अकलापूर येथे १, समनापूर येथे २, वडगांव लांडगा येथे १ व कुरण येथे १ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तब्बल ४६ बांधीताची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील आश्वी बुद्रुक व शिबलापूर येथे पुन्हा बांधीत रुग्ण आढळून आले आहेत.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.