सामाजिक कार्यकर्ते विजय हिगें यांची मागणी.
संगमनेर Live | लॉक डाऊन काळात संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांच्या मदती करता महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे व यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाने या विभागातील आदिवासी बांधवा करिता तात्काळ खावटी योजना सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आदिवासी बांधव हा समाज कायम डोंगर दर्या खोर्यात राहतो. अनेक दिवस तो विकासापासून वंचित असून त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुक्यात नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बाबा खरात यांच्या नेतृत्वाखाली जन सेवकांसह विविध कार्यकर्ते काम करत आहेत. कोरोनाच्या संकटात या आदिवासी बांधवांना रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आणि अनेकांचे त्यामुळे हाल झाले या काळात त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला आहे.
तरी या विभागातील सर्व आदिवासी बांधवांना तातडीने खावटी योजना सुरू करावी म्हणजे या अंतर्गत प्रत्येक आदिवासी बांधवाच्या खात्यावर २ हजार रुपये व प्रत्येकाला किमान २ हजाराचे अन्य साहित्य मिळणार आहे. याचा लाभ आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, चिंचपूर, निमगांव जाळी, औरंगपूर, सादतपूर, खळी, चणेगांव, झरेकाठी या गावांसह गोरगरीब आदिवासी बांधवांना मिळणार असल्याने शासनाने कोणत्याही परिस्थितीत तातडीने योजना सुरू करावी. अशी मागणी विजय हिंगे यांनी केली असून या मागणीचे निवेदन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना दिले आहे.