◻ खा. राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ संगमनेरात युवक काँग्रेसची निदर्शने.
संगमनेर Live | उत्तर प्रदेशातील हाथसर येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात असलेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेली अटक व धक्काबुक्की अत्यंत निंदनीय असून या कृतीतून मोदी व योगी सरकार हे पुर्णपणे हुकूमशाही करत असल्याची घाणाघाती टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली असून उत्तर प्रदेशमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संगमनेर बस स्थानकासमोर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित निदर्शन मोर्च्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, नितीन अभंग, राजेश वाकचौरे , सौ. निर्मलाताई गुंजाळ, प्रा. बाबा खरात, मजहर शेख, अजय फटांगरे, शैलेश कलंत्री, शेखर सोसे, मुस्ताक शेख, योगेश जाजू, निलेश शिंदे, आकाश जेधे, प्रथमेश मुळे, सौ. राहाणे यासह विविध युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ही मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, देशात मोदी व योगी सरकारच्या काळात लोकशाही पायदळी तुडवून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. भारतीय राज्यघटनेत सक्षम विरोधक हा लोकशाहीत अत्यंत महत्वाचा ठरवला आहे. मात्र विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम मोदी सरकारकडून केले जात आहे. काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते खा. राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की अत्यंत निंदनीय असून याचा संपूर्ण भारतामधून निषेध व्यक्त होत आहे. गोरगरिबांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार यावर भाजपा नेते एक शब्दही बोलायला तयार नाही. मात्र सुशांतसिंह प्रकरण, रिया चक्रवर्ती , कंगना राणावत यांच्यावर बोलणारे भाजप नेते आज मात्र गप्प आहे.
महाराष्ट्रात एका छोट्या गोष्टीवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी कांगणा रणावत चे समाजासाठी योगदान काय.? मात्र उत्तर प्रदेशातील गोरगरिबांच्या मुलीवर अत्याचार झाला तेथे जगलराज सुरु आहे. महिला भगिनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी उत्तर प्रदेशात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.
यावेळी अफजल शेख, अनिस शेख, लाला शेख, वैष्णव मुर्तडक, रमेश गफले, विजय उदावंत, भूपेश भळगट, हर्षल राहाणे, सागर कानकाटे, नवनाथ ढोणे, चंदू क्षीरसागर, तात्या कुटे, सिद्देश घाडगे, शेहबाज शेख, हौदर अली शेख, तुषार वनवे, अमित गुंजाळ, भाऊसाहेब सातपुते, बाळा राक्षे, निलेश शिंदे, पांडूरंग खेमनर, अलोक बर्डे, सचिन खेमनर, भागवत कानवडे, प्रविण दिड्डी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.