◻ टाकावू वस्तू पासून बनवले टिकावू आकर्षक आकाश कंदील.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी व पानोडी येथिल बालपण स्कूलचे चिमुकल्यानी कोरोना संकटकाळात घरी राहून ऑनलाईन शिक्षण घेत असताना आपल्या घरातील टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू बनवा या उपक्रमाअंतर्गत कागद, कार्डशिट, आकर्षक आकाश कंदील बनवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिपावली सणानिमित्त दिला आहे.
******
बालपणच्या चिमुकले कोरोणाकाळातही आपला आनंद व उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असून मागील चार वर्षापासून बालपणचे विद्यार्थी फटाके मुक्त दिपावली साजरी करत आहेत. दरवर्षी विद्यार्थी गावोगावी जाऊन समाजातील प्रत्येक घटकाला फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करतात व फटाके मुक्त दिपावलीची प्रतिज्ञा साजरी करतात. याही वर्षी चिमुकल्यांनी कोरोनापासून बचाव व पर्यावरण रक्षणासाठी फटाक्यांपासून होणारे प्रदूषण टाळता यावे यासाठी फटाके मुक्त दिवाळी साजरी करणार असून परिसरातील नागरिकांना सुध्दा आवाहन केले आहे.
*******
यावर्षी बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी फटाके मुक्त दिपावली चा संकल्प करताना टाकावू वस्तूपासून टिकावू आकर्षक आकाश कंदील बनवले आहेत. कोरोनामुळे घरी राहून आॅनलाईन शिक्षण घेत असताना चिमुकल्यानी विविध उपयोगी वस्तू बनवत शाळा व कुटुंबासाठी एक दिशादर्शक उपक्रम राबवला आहे. तर कोरोना काळातही आपला आनंद, उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. आज संपूर्ण जग कोरोनाशी लढत असल्याने फटाके मुक्त दिवाळी साजरी केल्यास प्रदूषण होणार नाही व आपला कोरोनापासून बचाव होईल असा सदेंश बालपणच्या चिमुकल्यांनी या माध्यमातून दिला आहे.
दरम्यान या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे, शिक्षिका शांता नागरे, राजश्री बोऱ्हाडे, सुचिता बालोटे, सीमा आव्हाड, अश्विनी बिडवे, स्नेहल अनाप, पल्लवी जाधव, संत, वंदना घोडेकर आदिनी परिश्रम घेतले आहे.