◻ शहरी भागासह आश्वी परिसरातील गावानमध्ये आज ३१ बाधीत रुग्ण.
संगमने Live | बुधवारी (११ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात आज ३१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून आज शहरी भागासह आश्वी परिसरालातील आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक व दाढ बुद्रुक या गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
*******
बुधवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर ८, आश्वी बुद्रुक येथे १, आश्वी खुर्द येथे ५, दाढ बुद्रुक येथे १, जोर्वे येथे १, नादूंर येथे २, निमगाव भोजापूर येथे १, ढोलेवाडी येथे १, घुलेवाडी येथे ३, गुंजाळवाडी येथे ६, समनापूर येथे १ व निमगाव टेभीं येथे १ असे एकून ३१ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द व दाढ बुद्रुक या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.