◻ शेडगावच्या भुमिपुत्राची मुंबईत भरारी.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगावचे भुमिपुत्र व मुंबई येथिल उद्योजक बापुसाहेब सांगळे यांच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून त्याच्या बी. जे. आटोमेशनच्या द्वितीय नूतन प्रशस्त कार्यालयाचे लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर, पश्चिम मुंबई येथे शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर उध्दघाटन होणार असल्याची माहिती बापूसाहेब सांगळे यांनी दिली आहे.
उद्योजक बापूसाहेब सांगळे याना सामाजिक कार्याची मोठी आवड असून कोरोनाच्या संकट काळात त्यानी आपल्या शेडगाव गावासह पंचक्रोशीतील गरजु नागरीकाना अर्थिक मदत दिली होती. तर आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टर, आरोग्यसेवक व आशासेविकाना मास्क व सँनेटाइजरचे वाटप करुन सामाजिक बाधिलकी जपली होती.
******
शेडगाव येथिल विविध सामाजिक कामाना ते नेहमी मदत करत असतात. मुंबई येथे उभारलेल्या बी. जे. आटोमेशनच्या माध्यमातून ग्राहकानमध्ये विश्वास निर्माण केल्यामुळे त्याच्यां यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून घाटकोपर येथे त्याच्या बी. जे. आटोमेशनचे द्वितीय कार्यालय सुरु होत असल्याने शेडगाव ग्रामस्थासह मित्रपरिवार व नातेवाईकाकडून बापुसाहेब सांगळे यांचे अभिनंदन होत आहे.