संगमनेर Live | दिपावलीचा सण संपुर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत या सणाचे विशेष महत्व असून घरोघरी पेटवली जाणारी पणती अंधार दुर करुन प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करते. सध्याच्या कोरोना संकटात सर्व नियम पाळून व मास्कचा वापर करुन हा सण साजरा करावा.
******
सण साजरे केल्याने प्रत्येकाचा आनंद व्दिगुणित होतो, यामुळे दिपावली हे मांगल्याचे प्रतिक असल्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिपावलीनिमित्त नागरीकाना दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
भारतीय संस्कृतीत दिपोत्संव म्हणून साजरा होणार्या सणात लहान थोर सर्व आनंदाने सहभागी होतात. राज्यात या वर्षी कोरोनाच संकट आहे. या दिवाळीत कोरोना कायमचा नष्ट होवून पुन्हा एकदा सर्वांना मोकळे जीवन जगता यावे ही प्रार्थना आहे. तसेच यावर्षी चांगला पाऊस झाला असुन सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी साखर कारखाना, दूध संघ, विविध सहकारी तसेच खाजगी संस्थांनी बोनस रुपाने सभासदांना व कर्मचार्यांना मोठी आर्थिक मदत केली आहे.
खरेदीसाठी सर्व बाजार पेठेत मोठी गर्दी दिसुन येत असल्याने सर्वाच्या चेहर्यावर आनंद आहे. पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरा करतांना पर्यावरण रक्षणाची ही काळजी सर्वांनी घ्यावी व सर्वांना आरोग्यदायी जीवन, भरभराटी लाभावी असे नामदार थोरात यांनी म्हटले आहे.
दिपावली प्रकाशातून आनंद निर्माण करणार सण - आ. डॉ. सुधीर तांबे
दिपावली हा प्रकाशातून आनंद निर्माण करणारा सण आहे. भारतीय संस्कृतीत या सणाचे महत्व मोठे असून सर्वांनी एकत्र येवून हा सण साजरा करावा. एकमेकांच्या जीवनात आनंद निर्माण करतांना समृध्द कुटुंबाच्या उभारणीबरोबर समृध्द देशाच्या उभारणीत ही सहभाग द्यावा. ही दिपावली सर्वाना आनंदमय व भरभराटीची जावो. अशा शुभेच्छां नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिल्या आहेत.