◻ आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; आरोपी पोलीसाच्या ताब्यात.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल ३५ वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून पोलीस निरिक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासात पोलीसानी या अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
******
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, मी पानोडी या ठिकाणी कुटुंबियासमवेत राहत असून आमच्या घराशेजारी आमचे नातेवाईक आण्णा लहानु घुगे राहतात. तर त्याची पत्नी पुणे येथे कामाला असल्याने ते, पत्नी व मुले पुण्याला राहतात. शेतीतील कामानिमित्त आण्णा घुगे हे पानोडीला येत असतात. त्याची शेतजमिन आमच्या शेतजमिनी शेजारी असून मागील आठ दिवसापासून शेतीच्या कामासाठी ते गावी आले होते.
******
दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मी आमच्या शेतात गवत कापण्यासाठी गेले असताना आण्णा घुगे तेथे आला व माझ्या अंगाला झटू लागला. मला तुझ्यावर प्रेम करायचे आहे असे म्हणत मला शेताच्या कडेला घेऊन गेला. मी विरोध केला असता त्याने मला न जुमानता माझ्यावर बळजबरीने अत्याचार करुन पळून गेला. यामुळे मला अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे. घरी येऊन मी घडलेला प्रकार सांगितल्यानतंर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आरोपी आण्णा लहानु घुगे यांच्या विरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुरंव नंबर ४३८/२०२० प्रमाणे भादंवी कलम ३७६, ४४७, ३२३ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीसानी दिली आहे.