◻ कोरोनाचा आश्वी बुद्रुक नतंर आज उंबरी बाळापूरला जोरदार दणका तर आश्वी खुर्द, प्रतापपूर, रहिमपूर व अन्य गावातही वाढली रुग्ण संख्या.
संगमने Live | शनिवार (२१ नोव्हेंबर) रोजी संगमनेर तालुक्यात तब्बल ६० कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तालुक्यात पन्नासच्या पट्टीत रुग्ण सख्या वाढली आहे. आज शहरी भागासह आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, प्रतापपूर व रहिमपूर या गावानमध्ये नव्याने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान काल शुक्रवारी तालुक्यात ४६ कोरोना बाधीत रुग्ण आढळले होतेे.
शनिवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर शहर ९, आश्वी बुद्रुक येथे ५, आश्वी खुर्द येथे ३, उंबरी बाळापूर येथे ९, प्रतापपूर येथे २, रहिमपूर येथे १, सावरगातळ येथे ३, झोळे येथे १, गुंजाळवाडी येथे ७, निमगाव खुर्द येथे ३, धादंरफळ खुर्द येथे १, आंबी खालसा येथे २, राजापूर येथे १, घुलेवाडी येथे ७, बिरेवाडी येथे १, चिखली येथे १, मांचीहिल येथे १, निमज येथे १, खांडगाव येथे १ व वडगावपान येथे १ असे एकून ६० कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, प्रतापपूर व रहिमपूर या गावामध्ये आज नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने कोरोना आजारापासून स्वत:चा, कुटुंबाचा व समाजाचा बचाव व्हावा यासाठी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिगंचे पालन तसेच प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे गरजेचे आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.