संगमनेर Live | मांग गारुडी समाजातील विविध प्रश्नांनाबाबत लढा देणे, या वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच समाजाला राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवा संस्था राज्य उपाध्यक्ष सचिन उपाध्ये तसेच राज्य संघटक अमोल राखपसरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दिपक लोंढे यांच्या हस्तें करण्यात आले.
यावेळी मांचीहिल उद्योग समूहाचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सरूनाथ उंबरकर, सुशीलकुमार भंडारी, सरपंच महेश गायकवाड, संतोष भडकवाड, मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवा संस्थाचे सचिव विकास पाथरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, शाहीर वाल्मीक फाजगे, शाखा अध्यक्ष अशोक राखपसरे, उपाध्यक्ष निलेश राखपसरे, सचिव मोहन चव्हाण, खजिनदार राधाकृष्ण राखपसरे, कार्याध्यक्ष सोमनाथ उकीर्डे, रामनाथ जऱ्हाड, गणेश खेमनर, अनिल बर्डे, आश्वी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य गोर्डे, प्रा. चव्हाण, प्रा. शहाणे आदिसह मांग गारुडी समाज बांधव आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरानी मनोगत व्यक्त केले आहे.