◻ ना. आठवलेकडून वाघमारे कुटुंबियाचे केले सात्वंन.
संगमनेर Live | केंद्रिंय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यानी नुकतीच दाढ बुद्रुक (ता. राहाता) या ठिकाणी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथिल कमानीचे उध्दघाटन केले आहे.
ना. रामदास आठवले हे नुकतेच शिर्डी दौऱ्यावर आले होते. रिपाईचे जेष्ठ नेते श्रावण वाघमारे यांच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी निधन झाल्याची माहिती त्यांना होती. यावेळी त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत दाढ बुद्रुक येथिल वाघमारे याच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबियाचे सात्वंन केले. यानतंर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे कमानीवरील फलकाचे उध्दघाटन ना. आठवले याच्या हस्तें करण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्ते मदन दिवे, राजाराम टपळे, गुलाब पाळदे, भारतशेठ रोकडे, गौतम भोसले, जॉन पाळदे, योगेश तांबे, नाना पाळदे, निलेश दिवे, प्रविण दिवे, दिपक टपळे, सागर पाळदे, थॉमस भोसले, सागर भोसले, सागर टपळे, अनमोल दिवे, ब्रम्हा टपळे, महेश टपळे, सुरज टपळे, सनी टपळे, शिवा भोसले, महेंद्र पाळदे, रोहित पाळदे, विक्रम पाळदे, राजा भोसले आदि उपस्थित होते. याप्रसंगी ना. आठवले यांचा सत्कांर करण्यात आला आहे.