लोणी बुद्रूक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध सलग २५ वर्षांची प्रथा कायम.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी घालून दिलेली परंपरा कायम राखत लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग २५ वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा कायम राखून आदर्श निर्माण केला आहे.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माजी मंत्री आणि जेष्ठ नेते आण्णासाहेब म्हस्के पाटील, भाजपा नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह गावातील जेष्ठ व्यक्तीनी इच्छुक सर्व उमेदवारांशी संवाद साधून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. सर्व समाज घटकांना प्रतिनिधीत्व मिळेल आशा दृष्टीने सर्वाच्या सहमतीने उमेदवार निश्चित केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यंदाही कायम राहीली आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने विकासाच्या प्रक्रियेला नेहमीच प्राधान्य दिले. सामाजिक हिताल महत्व देवून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह महत्व दिले जात असल्याने लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीचा देश आणि राज्य पातळीवर विविध पुरस्कारांनी गौरवही झाला आहे. करोना संकटातही ग्रामपंचायतीने उत्कृष्ट नियोजन करून नागरीकांना दिलासा देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

प्रभाग‍ निहाय बिनविरोध निवडून आलेल्‍या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे प्रभाग क्र. १ मध्‍ये भाऊसाहेब पंढरीनाथ धावणे, सौ. मंजुश्री सरोज साबळे, सौ. उज्‍वला अर्जुन बोरसे, प्रभाग क्र. २ मध्‍ये रामनाथ वेणुनाथ विखे, गणेश रंगनाथ विखे, सौ. कल्‍पना विठ्ठल मैड, प्रभाग क्र. ३ मध्‍ये प्रविण भाऊराव विखे, सौ. उषा संतोष विखे, प्रभाग क्र.४ मध्‍ये मयुर हरिष मैड, दिलीप जगन्‍नाथ विखे, शोभा संभाजी विखे, प्रभाग क्र ५ मध्‍ये दिपक भाऊसाहेब विखे, सौ. सुनिता गोरक्षनाथ चव्‍हाण, सौ. सिंधुबाई सुभाष म्‍हस्‍के , प्रभाग क्र. ६ मध्ये सचिन गुलाब ब्राम्‍हणे, सौ. कविता गोरक्ष दिवटे, सौ. सुचित्रा कैलास विखे आदि उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सहकार्य करण्याऱ्या इच्छुकांचे आभार मानून नूतन सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्‍यासाठी जेष्‍ठनेते काशिनाथ विखे, किसनराव विखे, एम. वाय विखे, अँँड. गोकुळ धावणे, संपतराव विखे, नंदू राठी, रावसाहेब साबळे, माजी सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, अनिल विखे, राहुल धावणे, भाऊसाहेब विखे, लक्ष्‍मण विखे, अनिल विखे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

माजीमंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली गावात ५ वर्षे काम करण्‍याची संधी मिळाली. गावात गत पाच वर्षात सर्वांना बरोबर घेवून विकास कामे करण्‍यात आली. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विकासाच्या प्रक्रियेला नेहमीच प्राधान्य दिले. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्‍यामुळेच ग्रामपंचायतीने विविध पुरस्‍कार पटकाविले त्‍यामुळे ग्रामपंचायतीचा नावलौकीक राज्‍यसह देशपातळीवरही झाला.

अनिल नानासाहेब विखे
माजी उपसरपंच, लोणी बुद्रूक
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !