◻ आ. विखे पाटील याना माननाऱ्या कार्यकर्त्याच्या गटातच सत्तेसाठी रस्सीखेच.
◻ ना. थोराताना माननारा गटही निवडणूकीच्या रिगंणात उतरल्याने रंगत वाढली.
संगमनेर Live | ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले असून ४ जानेवारी रोजी संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदारसंघात येत असलेल्या १४ ग्रामपंचायतीच्या १३८ जागासाठी २८१ उमेदवार निवडूक लढवणार असल्यावर शिकामोर्तब झाल्यामुळे १४ गावातील बहुताश ठिकाणी निवडनुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी लगभग सुरु झाली आहे.
आश्वी परिसरातील १४ गावापैकी ३,६०३ मतदार संख्या असलेल्या कनोली ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या ११ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ११ जागासाठी २२ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. ३,५८२ मतदार संख्या असलेल्या पिप्रीं - लौकी अजमपूर ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या १२ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ११ जागासाठी २२ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. ४,६८९ मतदार संख्या असलेल्या चिचंपूर ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या ३० उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता १३ जागासाठी २६ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. २,५६२ मतदार संख्या असलेल्या चणेगाव ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या ४ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ९ जागासाठी २० उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. २,२३९ मतदार संख्या असलेल्या झरेकाठी ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या १८ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ९ जागासाठी १९ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत.
३,५२४ मतदार संख्या असलेल्या पानोडी ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या १० उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ११ जागासाठी २४ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. २,१३९ मतदार संख्या असलेल्या प्रतापपूर ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या ३१ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ९ जागासाठी २८ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. २,६४५ मतदार संख्या असलेल्या शेडगाव ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या १८ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ९ जागासाठी १८ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. १,६०५ मतदार संख्या असलेल्या ओझर बुद्रुक ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या ८ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ९ जागासाठी १७ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. ९३२ मतदार संख्या असलेल्या औरंगपूर ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या १४ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ७ जागासाठी १४ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत.
२,९०१ मतदार संख्या असलेल्या खळी ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या २ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ११ जागापैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून ४ जागासाठी ९ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत.
२,५६६ मतदार संख्या असलेल्या दाढ खुर्द ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या १० उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ९ जागासाठी १८ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. ३,०८१ मतदार संख्या असलेल्या शिबलापूर ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या २१ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ११ जागासाठी २२ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत. ३,०८१ मतदार संख्या असलेल्या मनोली ग्रामपंचायतीत सदंस्य पदासाठी इच्छूक असलेल्या १६ उमेदवारानी माघार घेतल्यामुळे आता ११ जागासाठी २२ उमेदवार निवडणूक रिगणांत उतरले आहेत.
दरम्यान कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतकरी व जनसेवा मंडळात ग्रामपंचायतीच्या लढती होणार असल्या तरी परिसरातील प्रतापपूर येथे आ. विखे पाटील याना माननाऱ्या कार्यकर्त्याचे तीन गट पडल्यामुळे त्याच्यातचं सत्तावर्चस्वाची लढाई रंगणार असल्याचे चित्र उभे राहिले आहे. तर इतर गावानमध्ये भाजप विरुद्ध कॉग्रेस अशी दुरंगी लढत होणार आहे. तसेच आश्वी परिसरातील दोन पत्रकाराच्या पत्नी व एक पत्रकार निवडणूकीच्या रिगणांत उतरूण नशीब आजमावत आहेत.