◻ पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व त्याच्या पथकाने मुबंई येथून घेतले ताब्यात.
◻ दोन महिन्यापासून होता फरार ; उर्वरित तीन फरार आरोपीचा शोध सुरु.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथिल २६ वर्षीय तरुणीला साखरपुडा झाल्यानतंर अपशकूनी म्हणून हिनवत लग्न करण्यास नकार दिल्यामुळे या तरुणीने दोन महिन्यापूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात चार जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी सागर अर्जुन सानप (वय - २७) याला पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व त्याच्या सहकाऱ्यानी बुधवारी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात दोन महिन्यापुर्वी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले होते की, गुरुवार दि. ५ नोव्हेबर २०२० रोजी सकाळी हंगेवाडी शिवारात पांडुरंग सांगळे यांच्या शेतातील विहीर मध्ये भारती भास्कर सांगळे ही मुलगी मृतावस्थेत आढळूून आली. मयत भारती सांगळे हिचा मुंबई येथील सागर अर्जुन सानप यांच्या बरोबर विवाह ठरला होता. त्यांचा दि. ३० जून २०२० रोजी साखरपुडा ही झाला होता. मुलीच्या घरच्यांनी मुलाकडील घरच्यांना एक तोळे सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये रोख विश्वासाने दिले होते. तर मुलाकडच्यानी मयत भारती हिस दोन तोळे सोन्याचे नेकलेस व कानातील दागिने दिले होते.
साखरपुडा झाल्यानंतर सागर सानप याने मुुलीच्या घरच्याशी चांगले संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन केला. सागर याने साखरपुड्यात दिलेले दागिने व्यवस्थित करून आणतो असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सागर यांने मयत भारती हिला फोन केला व तुझ्या घरचे आमच्यासाठी अपशकून असल्याचा आरोप करुन ठरलेला विवाह मोडल्याचा सागितले. तर साखरपुड्यात दिलेले दागिने व रोख रक्कमेस ना कबूल गेले. तसेच मयत व कुटुंबीयास शिवीगाळ करून पुन्हा आमच्याशी संपर्क करू नका असे म्हणत मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे मयत भारती हीने विहिरीमध्ये आत्महत्या केल्याचे दाखल तक्रांरीत म्हटले होते.
त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात सागर सानप, अर्जुन सानप, सुजाता सानप, स्नेहा आव्हाड (सर्व रा. नेहरु नगर, कुर्ला इस्ट, मुंबई) या ४ जणावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, सोन्याचे दागिने व पैशाचा अपहार केल्याबद्दल गुन्हा रजी. नं ४३१/२०२० प्रमाणे भादंवी कलम ३०६, ४०६, ५०४/३४ नुसार गन्हा दाखल केला होता.
दरम्यान या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यानी वेगाने तपासाला सुरवात केली. परंतू जंग जंग पछाडूनही आरोपी दोन महिन्यापासून पोलीसाच्या हाती लागत नव्हते, त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेत असताना त्यानी आरोपीच्या जवळच्या संशयित नातेवाईकाला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता फरार आरोपी सागर अर्जुन सानप हा मुंबई येथिल चेबुंर या ठिकाणी कामानिमित्त येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे सोमवारी पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, मुख्य हवालदार वाघचौरे, वाघ व शिदें हे मागील दोन दिवसापासून याठिकाणी तळ ठोकून होते. बुधवारी आरोपी हा चेबुंर या ठिकाणी आला असता पोलीसानी मोठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळत आश्वी पोलीस ठाणे येथे आणले होते. तर गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील बाकीचे तीन आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.