संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्री-लोकी अजामपुर येथील रहिवासी व स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जवळचे सहकारी असलेले शॉम्प्रोचे माजी चेअरमन बाळकृष्ण भिकाजी दातिर (वय - ८२) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले असून त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बाळकृष्ण दातीर हे पिंप्री लौकी अजामपूर गावचे पोलिस पाटील व प्रथम सरपंच होते. तर सेवा संस्थेचे चेअरमन, लोकर विणकर संस्थेचे चेअरमन, जॉइंड फारमिंग संस्थेचे चेअरमन, पिंप्री लौकी अजामपुर सहकारी दुध संस्थेचे चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्षासह साकुर जिल्हापरिषद गटातुन ७ वर्ष जिल्हापरिषदेचे ते सदस्य होते. तसेच थोरात कारखन्याचे संचालक आदि महत्वाची पदे त्यानी भुषवल्याने जिल्ह्यात एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते. तर शँप्रोचे २५ वर्ष ते चेअरमन होते.
राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकरी असल्याने त्याची निधनवार्ता कळताच ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधिर तांबे, दुर्गाताई तांबे, इद्रजीत थोरात, जिल्हापरिषद सभापती मिराताई शेटे, शिवाजीराव थोरात, बाजीराव खेमनर, बाबा ओहळ, अँड. शाळीग्राम होडगर, पाराजी चकोर, गणपतराव सागळे, आण्णासाहेब भोसले आदिंनी दु:ख व्यक्त केले आहे. येथील राजेंद दातीर व कैलास दातीर यांचे ते वडील होते. त्याच्या निधनामुळे पिंप्री-लौकी अजामपुर पंचक्रोशीवर शोककळा पसरली असून सायंकाळी त्याच्यावर अत्यसंस्कार केले जाणार आहे.