◻ आश्वी बुद्रुक येथे साकारत आहे जिल्ह्यातील सर्वात भव्य श्रीराम मंदिर.
◻ २० लाखाची बक्षिसे ; मारुती कार, मोटार सायकलीसह ७०१ बक्षिसे.
संगमनेर Live | अहमदनगर जिल्ह्यातील पुरातन व ऐतिहासिक पार्श्वभूमि लाभलेल्या मंदिरानमध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल प्रभु श्रीरामाच्या मंदिराला समावेश असून आध्यात्मिक क्षेत्रात या मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या मंदिराचा जिर्णोद्धारासाठी निधी उभारावा यासाठी ग्रामस्थानी लकी ड्रॉ चे आयोजन केले असून उब्रेश्वर व रामेश्वर मठाचे महंत दत्तंगिरी महाराज याच्या हस्तें या लकी ड्रॉ योजनेचा शुंभारंभ करण्यात आला आहे.
आश्वी बुद्रुक येथे पुरातन असे श्रीराम मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. या दोन्ही मंदिराच्या जिर्णोद्धाराचा संकल्प ग्रामस्थानी केला असून श्रीराम मंदिराचे बांधकाम अंतीम टप्प्यात आले आहे. कोरोनाच्या जागतीक संकटमुळे निधीअभावी हे काम मंद गतीने सुरु असल्यामुळे ग्रामस्थं व जिर्णोद्धार समितीने या उर्वरीत बांधकामासाठी निधी उभा करण्यासाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे. या योजनेतील तिकीट विक्रीचा शुंभारंभ वरंवडी येथिल उब्रेश्वर व रामेश्वर मठाचे महंत दत्तंगिरी महाराज याच्या हस्तें गुरुवारी करण्यात आला. यावेळी आश्वी ग्रामस्थाच्या वतीने माजी सरपंच बाळकृष्ण होडगर यांनी दत्तगिरी महाराजांचा सत्कार केला. हा लकी ड्रॉ यशस्वी होऊन याच वर्षी प्रभू श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम होईल असे शुभाशिर्वाद दत्तगिरी महाराजानी याप्रसंगी दिले आहेत.
दरम्यान या लकी ड्रॉ मध्ये २० लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून १ मारुती अल्टो कार, ४ मोटार सायकल सह एकूण ७०१ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर सोडत १३ मार्च रोजी गुडीपाडव्याला आश्वी इंग्लिश स्कूल येथे काढली जाणार आहे.
दरम्यान या लकी ड्रॉ च्या शुभारंभ प्रसंगी बाळकृष्ण होडगर, भाऊराव कांगुणे, विजय हिंगे, सुमतीलाल गांधी, माधवराव गायकवाड, विनायक बालोटे, सुभाष म्हसे, शाळीग्राम चंद, नामदेव मदने, सुशील भंडारी, कैलास बिहानी, ब्रिजमोहन बिहानी, सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, सुरेश मदने, गीताराम गायकवाड, प्रवीण गायकवाड, विजय म्हसे, अस्लम शेख, अण्णा जऱ्हाड आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. तर श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या या पवित्र कार्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील तमाम नागरिकांनी या लकी ड्रॉ ची तिकीटे घ्यावी व श्रीराम मंदिर उभारणीत हातभार लावावा असे आवाहन श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समितीने केले आहे.