◻ १० हजाराची औषधे व ११ हजाराची मदत डॉ. तय्यब तांबोळी याच्याकडे सुपुर्द.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेवक व कर्मचारी मागील दिड वर्षापासून कोविड - १९ विरुद्ध लढाईत अथक मेहनत घेत आहेत. या लढाईत आपला देखील अल्प सहभाग असावा म्हणून के. आर. जोंधळे कृषी सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णालयाला १० हजार रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य व औषधे भेट म्हणून देण्यात आली आहेत. तसेच गावातील कृषी उद्योजक व शाहिद जवान अशोक डेंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीपराव डेंगळे यांनी व्यतिश: ११ हजाराची मदत आरोग्य केंद्राचे प्रमुख दिली आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी, सरपंच अमोल जोंधळे, उपसरपंच अनिल डेगंळे, दिलिपराव डेगंळे, सामजिक कार्यकर्ते सुनील डेंगळे, ठकाजी थेटे, शिक्षक लंगोटे, नंदू डेंगळे, बाळासाहेब तळोले, मच्छिद्रं जोंधळे आदि उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर येणारा ताण पहाता केवळ शासन, जिल्हा परिषद, स्थानिक ग्रामपंचायत यांचा निधी पुरेसा नसून स्थानिक लोकप्रतिनिधी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचेही मोठे सहकार्य मिळत आहे. याकरिता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था यांनी पुढे यावे असे आवाहन निमगावजाळी ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल जोंधळे याच्यासह उपस्थित मान्यवरानी केले आहे.
दरम्यान सामाजिक उपक्रम राबवण्यात नेहमी आखाडीवर असणाऱ्या या दोन्ही संस्थाचे त्यांनी दाखवलेल्या सामाजिक भानामुळे सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.