पहिल्यादा चोरी करण्यात यशस्वी परंतू, दुसऱ्यादा चोरीचा प्रयत्न फसला.

संगमनेर Live
0
पोलीस व ग्रामस्थाच्या प्रसंगसावधानतेमुळे चोरटे गाडी व चोरीचा माल टाकून पळाले.

संगमनेर Live | तालुक्यातील चौधरवाडी शिवारात १५ ते १६ मे दरम्यान ३५ हजार रुपये किमतीची अँल्युमिनीयमची तार चोरुन नेल्याची घटना ताजी असताना २१ मे रोजी पहाटे पुन्हा चोरटे तार चोरी करण्यासाठी त्याच ठिकाणी आले होते. मात्र पोलीस व ग्रामस्थानी दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे चोरटे गाडी व चोरीचा माल टाकून पळाले असल्याची घटना घडली असून या चोरट्याना जेरबंद करण्याचे आवाहन आश्वी पोलीसापुढे ठाकले आहे.

विभासकुमार महतो यानी दुसऱ्यादा दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, चौधरवाडी शिवारातील टॉवर क्रंमाक १०३ ते १०४ ची ६४० चौरस एम. एम. जाडीची व १५ हजार रुपये किमंतीची अँल्युमिनीयम तार २१ मे रोजी ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुरंव नं - ७४/२०२१ नुसार भादंवी कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एक अनोळखी गाडी भरधाव वेगाने गेल्यामुळे दसऱ्यादा अँल्युमिनीयम तार चोरी करण्यासाठी चोरटे आल्याची चाहूल स्थानिक नागरीकाना लागली होती. त्यामुळे नागरीकानी रस्त्यामध्ये दगड लावून आश्वी पोलिसांना चोरटे आल्याची माहिती दिली. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. त्याचदरम्यान चोरटे भरधाव वेगाने आपले वाहन घेऊन येत असताना रस्त्यावर दगड लावलेले बघून थबकले. यावेळी नागरीकानी गाडीचा पाठलाग सुरु केल्याने चोरट्यानी गाडी मागे घेऊन मोकळ्या शेतातून गाडी पळवली पण नागंरठीत गाडी फसल्याने गाडी तेथेचं सोडून पाच ते सहा चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची थरारक घटना घडली आहे. 

दरम्यान यावेळी घटनास्थळावरुन महिद्रा बोलेरो (एम. एच. ०६ बी. जी. ०६६०) हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर याच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. डी. शिदें करत असून या चोरट्याना जेरबंद करण्याचे मोठे आवाहन आश्वी पोलीसासमोर उभे ठाकले आहे. तर चोरट्याबाबत धागेदोरे पोलीसाच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !