उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे भासवून शेडगाव येथे हॉटेल चालकाला लुटले.

संगमनेर Live
0
◻ शिबलापूर - संगमनेर रस्त्यावरील शेडगाव शिवारातील घटनेने खळबळ.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर - संगमनेर रस्त्यावर असलेल्या शेडगाव शिवारातील हॉटेल न्यु कॉर्नर च्या मालकाला आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे भासवत हॉटेलची तपासणी करण्याच्या बहाण्याने तीन तोतया अधिकाऱ्यानी २५ हजार रुपये लुटुन पलायन केले. यामुळे पंचक्रोशीत एकचं खळबळ उडाली असून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानतंर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन तोतया अधिकाऱ्याना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सुनिल माधव फड यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, शुक्रवार दि. २८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मी व माझा भाऊ अनिल हे आमच्या हॉटेल समोरील अंगणात बसलो होतो. त्यावेळी तेथे महिद्रां एसयुव्हि (एम. एच. १५ जी. आर. ६८८७) ही गाडी आली. त्या गाडीतून आलेल्या तिघानी आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे सागून तुमचे हॉटेल उघडा आम्हाला रेकॉर्ड चेक करायचे आहेत असे म्हणाले. त्यानतंर घरुन चावी आणून हॉटेल उघडल्यानंतर तू हॉटेल का उघडलेस असे लाल शर्ट घातलेला व्यक्ती मला म्हणाला. हॉटेल बंद असून तुम्ही उघडा म्हटल्याने मी उघडले असे म्हटल्यानतंर दुसरा व्यक्ती म्हणाला की लॉकडाऊन मध्ये हॉटेल चालू असल्याने तुझ्यावर केस करुन तुझे परमिट रद्द करतो. त्यामुळे मी असे करु नका म्हणताच लाल शर्ट घातलेला व्यक्ती मला बाजूला घेऊन म्हणाला की आम्ही कारवाई करणार नाही गाडीत बसलेल्या साहेबाना मी सागतों असे म्हणत २५ हजार रुपयाची मागणी केली. 

मी घाबरलेलो असल्याने घरातून २५ हजार रुपये आणून लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या हातात दिले. यावेळी त्याच्याबरोबर दोन व गाडीत दोन व्यक्ती बसलेले होते. माझ्याकडून पैसे घेऊन ते घाईघाईने जात असल्यामुळे मला त्याचा संशय आला व मी त्याना थांबण्यास सागितले परंतू, ते माझा आवाज न ऐकताचं गाडीत बसून निघुन गेले. त्यामुळे मी व माझा भाऊ अनिल यानी दुचाकीवरुन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना आश्वी बुद्रुक येथिल पेट्रोल पंपाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते आमच्या दुचाकीला कट मारुन भरधाव वेगाने निघुन गेले असल्याचे दिलेल्या तक्रांरीत म्हटले आहे.

दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नबंर ९३/२०२१ नुसार भादंवी कलम १७०, ३८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील व त्याचे सहकारी करत आहेत. तर आवघ्या काही तासात भिमराव वाघमारे व रामेश्वर शिदें (दोघे रा. सिन्नर, जि. नाशिक) या दोन तोतया अधिकाऱ्याच्या मुसक्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, हवालदार काळे, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, होमगार्ड गुळवे यानी आवळून सिन्नर येथून ताब्यात घेतले असून इतर आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !