◻ हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरवात.
संगमनेर Live (संजय गायकवाड) | ६० ते ७० च्या दशकात ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव असल्याने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने विद्यार्थ्याची शिक्षणाची अडचण दुर व्हावी, गोरगरीब मुला-मुलीना चागले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे १० जून १९७१ साली कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे लहानशे रोपटे लावले होते. आज २०२१ म्हणजे तब्बल ५० वर्ष उलटून गेल्यानतंर विद्यालय ‘ सुवर्ण महोत्सवी ’ वर्ष साजरे करत असताना या रोपट्याचे वटवृक्षात रुपातर झाले असून सुवर्ण महोत्संव हा कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतिने वर्षभर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाने दिली आहे.
आश्वी खुर्द येथे १० जून १९७१ साली येथिल जिल्हापरिषदेच्या शाळेत विद्यालय सुरु करण्यात आले होते. तत्कालीन विद्यालयाच्या दोन वर्ग खोल्याचे उध्दघाटन आशिया खंडातील पहिल्या सहकारी कारखान्याचे संस्थापक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील याच्या हस्तें करण्यात आले. त्यावेळी मांढरे गुरुजी, गजानन खर्डे, बजाबा गायकवाड, मारुती बाप्पा गायकवाड, गंगाधर भवर, अण्णासाहेब भोसले आदिनी पुढाकर घेऊन सुरु केलेल्या विद्यालयाला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र पद्मश्रीनी हा प्रस्ताव फेटाळून लावत शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव देण्याचे सुचवले.
दोन शिक्षक व ३५ विद्यार्थानवर दोन खोल्यामध्ये शाळेचा श्रीगणेशा करण्यात आला. शाळेचे प्रथम शिक्षक म्हणून दिवगंत एस. के. मुसमाडे, भालेराव व क्लार्क म्हणून बी. बी. तक्ते यानी कामाला सुरवात केली. यावेळी विद्यालयात ८ वी चा वर्ग सुरु करण्यात आल्यानतंर विद्यालयात प्रवेश घेणारे प्रथम विद्यार्थी होण्याचा मान विठ्ठल वर्पे याना मिळाला. पुढे जाऊन काही वर्षानी आपले शिक्षण पुर्ण करून याचं विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करताना माजी प्राचार्य म्हणून विठ्ठल वर्पे हे सेवानिवृत्त झाले आहेत.
१९७५ साली १० वी व ११ वी च्या वर्गासाठी विद्यालयाला परवानगी मिळाली होती. परंतू शाळेला इमारत नसल्याने शाळा ही चावडी, जुना सरकारी दवाखाना, विठ्ठलराव सोनवणे यांच्या खोल्या, सेवा सोसायटीच्या खोल्या, अंगणवाडी आदि ठिकाणी भरत असे. दिवसेंदिवस शाळेच्या विद्यार्थी संख्येत वाढ होत असल्याने विद्यालयात शिक्षकाची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे दिवगंत एस. के. मुसमाडे याच्यांकडे विद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी देण्यात आली होती. शिक्षक भालेराव, टि. के. गुंजाळ, काकडे, डि. के. विखे, कोल्हे, अकोलकर, काशिद, थोरात, टेमक, गाढे, भोत, केकाण, पागिरे, सातपुते, पाटील, टेमकर, संपतराव भोकरे, जधव, लोखंडे, भागवत, पाबळ, मुळे, शेख, ब्राम्हणे, गाडे, धस, श्रीमती देशवंडीकर, शिदें, गोधंळे, नवले, पागिरे आदि शिक्षकानी विद्यालयाच्या वाटचालीत शिस्त, उच्च गुणवत्ता, सुदंर नियोजन आदिना महत्व दिल्याने अल्पावधीतच आश्वी खुर्द विद्यालय नावारुपाला आले.
१७ डिसेंबर १९७५ साली संस्थेच्या नुतन अशा सुसज्ज इमारतीचे उध्दघाटन तत्कालीन माजी मंत्री ना. दिवगंत बी. जे. खताळ पाटील यांच्या हस्तें व पद्मभुषण दिवगंत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या ५० वर्षाच्या काळात विद्यालयाने शाळा, विद्यालय ते कला, वाणिज्य, विज्ञान व संगणशास्र महाविद्यालयाची स्वतंत्र व प्रशस्त इमारत असा प्रवास केला आहे. आश्वी परिसरातील मुला बरोबर विशेषत: मुलीना या विद्यालयाचा मोठा लाभ होत असून विद्यालयातून शिक्षण पुर्ण केलेले शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
या वर्षी विद्यालयाचा सुवर्ण महोत्संव साजरा होत असताना विद्यालयावर प्रेम करणारे आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी तसेच विद्यालयाच्या वाढीसाठी सदैव पाठीशी उभे राहणारे विखे पाटील कुटुंब याच्या अथक परिश्रमातून लहानशा रोपट्याचा वटवृक्ष झाल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
आश्वी खुर्द येथिल विद्यालय सुवर्ण महोत्संवी वर्ष साजरे करत असताना विद्यालयाचा प्रथम विद्यार्थी तसेच याचं विद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी निवृत्त झालो. या आठवणी माझ्या आयुष्यातील बहुमोल ठेवा असून विद्यालयाच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या शिक्षक, ग्रामस्थं व विद्यार्थ्याचा विद्यालयाने संत्कार करणे गरजेचे असल्याची भावना विद्यालयाचे प्रथम विद्यार्थी व माजी प्राचार्य विठ्ठल वर्पे यानी व्यक्त केली आहे.